Alibaug : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त चौलमधील रामेश्वर मंदिर रोषणाईने उजळले

Alibaug: Rameshwar temple in Chaul lit up on Tripurari full moon
Alibaug : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त चौलमधील रामेश्वर मंदिर रोषणाईने उजळले

काल १८ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त साजरी करण्यात आली.या पौर्णिमेनिमित्त अलिबाग तालुक्यातील चौल येथील प्रसिद्ध आणि पुरातन रामेश्वर मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून गेले आहे. या दिवशी महादेव शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी आख्यायिका आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते. म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात. (छाया : उदय खोत) 

अलिबाग तालुक्यातील चौल या मंदिराच्या ऐतिहासिक गावातील श्री रामेश्वर मंदिरात त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

अलिबाग तालुक्यातील आक्षी, नागाव, चौल, रेवदंडा या गावांना मंदिराची गावे म्हणतात.

मंदिराला केलेल्या विद्युत रोषणाईने समोरील पोखरणी मध्ये प्रतिबिंब पडले असून, विद्युत रोषणाई पाहण्यास नागरिकांची मोठी गर्दी केली.

पूर्वी दिव्यांनी हे मंदिर उजळून जायचे. मात्र, आता विजेची रोषणाई मंदिरावर केली जाते.


हे ही वाचा – अर्जुन खोतकर यांचा जमीन बळकावण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांचा आरोप