घरठाणेOnline मद्यविक्री बंद करण्याचे आदेश? शुल्क विभागात संभ्रमाचे वातावरण!

Online मद्यविक्री बंद करण्याचे आदेश? शुल्क विभागात संभ्रमाचे वातावरण!

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात राज्य शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या ऑनलाईन मद्यविक्री बंद करण्याच्या खोट्या आदेशाने ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडवून दिली होती. परंतु जिल्हाधिकारी यांची बनावट स्वाक्षरी करून हे पत्र बोगस तयार करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे सायबर गन्हे शाखेत तक्रार केली आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सायबर गुन्हे शाखा करीत आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला असण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी वर्तवली आहे.

राज्यात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्यातील सर्व आस्थापने बंद करण्यात आले होते, त्यात मद्यविक्री देखील बंद करण्यात आलेली होती. १५ मे २०२० रोजी ऑनलाईन मद्यविक्रीची परवानगी राज्यशासनाने दिल्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये ऑनलाईन मद्यविक्री सुरु करण्यात आली होती. ठाणे जिल्हाधिकारी यांनी देखील ठाणे जिल्ह्यात ऑनलाईन मद्यविक्री करण्यासाठी परवानगी दिली होती,  त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑनलाईन मद्यविक्री सुरु करण्यात आली होती. दरम्यान या ऑनलाईन मद्यविक्रीमधून शासनाला बऱ्यापैकी महसूल मिळत होता.

- Advertisement -

दरम्यान ५ जुलै ऑगस्ट २०२० रोजी मद्यविक्रीसाठी काऊंटर विक्री करण्याचे नव्याने आदेश जारी करण्यात आले होते,  ऑनलाईन मद्यविक्री देखील सुरु ठेवण्याचे आदेशात म्हटले होते. नव्याने आलेल्या आदेशाचे पत्र ठाणे जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने जरी करण्यात आले होते. दरम्यान १८ जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागातील अधिकाऱ्याच्या अधिकृत व्हाट्सअँप ग्रुपवर ठाणे जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र पोस्ट करण्यात आले होते,  ५ ऑगस्टच्या या पत्रात ऑनलाईन मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. या पत्रावरून ठाणे जिल्हयातील राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी ऑनलाईन विक्री बंद करण्याच्या वरिष्ठाच्याआदेशाची वाट पाहत असताना हि बाब राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांच्या लक्षात येताच त्यांनी या पत्राची चौकशी केली असता, असे कुठल्याही आदेशाचे पत्र  जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आले नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. या पत्रावरील स्वाक्षरी तपासली असता या पत्रावर ठाणे जिल्हाधिकारी याची हुबेहूब बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचे लक्षात येताच हे पत्र बोगस असल्याचे समोर आले.

या बोगस पत्रामुळे ठाणे जिल्हातील मद्य विक्री करणारे दुकानदार,ग्राहक,नागरीक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला व कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ऑनलाईन मद्य विक्री बंद झाल्याची अफवा पसरल्यामुळे ऑनलाईन मद्य विक्रीवर परीणाम होऊन शासनाचा महसुल बुडवण्याचा प्रयत्न करून शासनाची फसवणुक करण्यात आल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरीकामध्ये मद्य विक्री बंद झाल्याची अफवा पसरल्यामुळे ऑनलाईन मद्य विक्रीवर परिणाम होवुन शासनाचा महसूल काही प्रमाणात कमी झाला होता अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातीळ सूत्रांनी दिली.

- Advertisement -

प्रकार गंभीर असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने तात्काळ ठाणे सायबर गुन्हे विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. सायबर गुन्हे शाखेने कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास स्वतःकडे ठेवला असून हा खोडसाळपणा करणाऱ्याचा शोध घेण्यात येत असून याप्रकरणी तपास सुरु असल्याचे सायबर गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांच्याकडे चौकशी केली असता हा जाणीवपूर्वक केलेला खोडसाळपणा असून त्याचा तपास पोलीस करीत असून हा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती मिळून आल्यावर त्याने हा खोडसाळपणा का केला हे उघडकीस येईल असे उमप यांनी आपलं महानगरशी बॊलताना सांगितले.


हे ही वाचा – शाळा सुरू करण्याच्या गाइडलाइन्स तयार, १ सप्टेंबरपासून शाळा सुरू?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -