घरठाणेसॅल्यूट! RPF जवानाने वाचवला महिला प्रवाशाचा जीव

सॅल्यूट! RPF जवानाने वाचवला महिला प्रवाशाचा जीव

Subscribe

मुंब्रा रेल्वे स्थानकातील थरारक घटना

मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमध्ये चढताना एक महिला प्रवासी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत पडत असताना कर्तव्यावर असलेल्या रेल्वे जवानाने प्रसंगावधान दाखवून त्या महिलेचा जीव वाचवला. शनिवारी घडलेली ही घटना रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. तसेच या सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृश्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २वर नाजिया सहजाद शेख आपल्या मुलीबरोबर सीएसएमटीला जाण्यासाठी लोकलची वाट पाहत उभी होती. यादरम्यान लोकल ट्रेन येताच नाजिया सहजाद शेखची मुलगी लोकल ट्रेनमध्ये चढली. त्यानंतर नाजिया लोकलमध्ये चढत असताना लोकल सुरू झाली. तेव्हा धावत्या लोकलमध्ये तिने चढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तेव्हा कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान मंगेश वाघ यांनी लोकलकडे धाव घेतली आणि घसरत जाणार्‍या त्या महिलेला उचलून लोकलमध्ये चढवले. त्यानंतर महिला प्रवासी नाजियाने मंगेश वाघ यांचे मानले आभार मानले.

- Advertisement -

मंगेश वाघ यांचा होणार गौरव

मुंबई विभागाचे रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त के.के. अशरफ यांनी सांगितले की, ‘आमचे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर आणि सर्तक असतात. अनेकदा आपला जीव धोक्या घालून आजपर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचले आहेत. मंगेश वाघने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका महिला प्रवाशाचा जीव वाचला आहे. आमचे जवान उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आम्ही या जवानाचा सत्कार आणि गौरव करणार आहे.’

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

ही घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आरपीएफ जवान मंगेश वाघ यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मंगेश वाघ यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले की, ‘प्रवाशांना सुरक्षित ठेवणे आमचे हे काम आहे. मला हे काम करत असताना समाधान वाटते. प्रवाशांना आवाहन आहे की, धावती लोकल पकडू नयेत.’

- Advertisement -

हेही वाचा –  लालबाग सिलिंडर स्फोट: मृतांची संख्या ६वर, ७ जण चिंताजनक


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -