घरठाणेसंत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न

संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्ती अंतर पाळून सर्व नियमांचे पालन करून वारकरी, भाविक आणि नामदेव शिंपी समाज बांधवांनी हा मंदिरात सोहळा साजरा केला.

नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जागी या कीर्तनरूपी अभंग सेवेतून जगातील सर्व सामान्य नागरीकांना ज्ञानाचा संदेश देणारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 671 वा.पुण्यस्मरण संजीवन समाधी सोहळा भिवंडीत मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्ती अंतर पाळून सर्व नियमांचे पालन करून वारकरी, भाविक आणि नामदेव शिंपी समाज बांधवांनी हा मंदिरात सोहळा साजरा केला. तर अनेक भाविकांनी घरीच संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली. भिवंडीतील ठाणगे आळी येथे संत नामदेव महाराजांचे पुरातन मंदिर असून दरवर्षी मंदिरात  संजीवन समाधी सोहळा संपन्न केला जातो.

- Advertisement -

मंदिरात  भजन, किर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. कल्याण ठाणे,डोंबिवलीसह अनेक शहरातून व ग्रामीण भागातील भक्तांगण मंदिरात येत असतात. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. मात्र कोरोनाची पार्श्वभूमीवर लक्षात घेता यंदा मंदिरात होणारे  सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

मात्र सकाळी हभप प्रफुल्ल लंगडे यांच्या उपस्थितीत मंदिरात संत नामदेव महाराजांच्या मुर्ती अभिषेक पूजन, महाआरती करून आणि नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले. तसेच या वेळी समाज बांधवांनी मंदिरात कोकणातील पुरग्रस्तासाठी देणगी जमा करून ती अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय  महासंघाचे कोकण विभाग प्रमुख रविंद्र कालेकर यांच्या कडे सुपूर्द केल्याच माहिती समाजाचे अध्यक्ष महेंद्र माडकर,भानुदास भसाळे यांनी दिली.या वेळी अध्यक्ष महेंद्र माडकर,भगवान वेल्हाळ,ओमकार लगडे,नाना वेल्हाळ,जयेश हाबडे,बाळकृष्ण वेल्हाळ,छायाताई सोमनाथ माडकर आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – Tokyo Olympics : नवे आहेत, पण छावे आहेत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -