घरमहाराष्ट्रनाशिकमहावितरणचा ग्राहकांना शॉक

महावितरणचा ग्राहकांना शॉक

Subscribe

चेक बाऊन्स झाल्याने आकारणार ८८५ रुपये दंड

महावितरणच्या वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी राज्यात दरमहा सुमारे १० हजार ५०० धनादेश चेक बाऊंस होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटीसह ८८५ रूपयांचा दंड पुडील महिन्याच्या वीजबिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे.

‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध असली तरी अद्यापही सुमारे ४ लाख ५१ हजार वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. यामध्ये पुणे परिमंडलामधील सर्वाधिक १ लाख ८ हजार, भांडूप परिमंडल- १ लाख ४ हजार, कल्याण परिमंडल- ७३ हजार तसेच नाशिक, कोल्हापूर, बारामती, नागपूर परिमंडलातील २४ हजार ते २९ हजार ग्राहकांचा समावेश आहे. मात्र दरमहा सुमारे १० हजार ५०० ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश बाउंस होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील १७५०, कल्याण- १७००, भांडूप- १५००, नागपूर- ११००, बारामती- ९०० व इतर परिमंडलातील ७० ते ८०० ग्राहकांचा समावेश आहे. या सर्व ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी ७५० रुपये बँक अडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५ रुपये असे एकूण ८८५ रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे.

- Advertisement -

लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांचे बिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी ऑनलाईनद्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -