घरमहाराष्ट्रनाशिकशिवसेनेची कमळ वाहून खड्ड्यांना श्रद्धांजली

शिवसेनेची कमळ वाहून खड्ड्यांना श्रद्धांजली

Subscribe

सत्ताधार्‍यांचा निषेध करत लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची केली मागणी

भाजपचा निषेध करत शिवसेनेच्या वतीने प्रभाग १ मध्ये रस्त्यावरील खड्ड्यांत ‘कमळ’ वाहून श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले.म्हसरूळ, पोकार कॉलनी, आरटीओ कॉर्नर, किशोर सूर्यवंशी मार्ग आणि जूना जकात नाका या परिसराचे प्रतिनिधित्व गेल्या १५ ते २० वर्षांपासून हे भाजपचेच लोकप्रतिनिधी करत असतानाही आजही रस्ते, पाणी आणि वीज हे प्रश्न सोडवले गेले नाहीत. या भागातील काँग्रेस आणि भाजप लोकप्रतिनिधींना प्रभाग सभापती ते महापौर अशी महत्त्वपूर्ण पदे लाभलेली होती आणि आता सलग दुसरे वर्षे आहे की स्थायी समिती सभापती पद हे याच भागाला लाभलेले आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च करूनही खड्डे पडतात. दोन दिवसांपूर्वीच स्थायी समिती सभापती यांनी पहाणी दौरा करून रस्ता दुरुस्तीची घोषणा केली, परंतु त्यावर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही म्हणून आज शिवसेनेच्या वतीने प्रभाग १ मध्ये हे आंदोलन करण्यात आले.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना कमळाची फुले वाहत श्रद्धांजली अर्पण करून सत्ताधार्‍यांचा निषेध करत मोठी जीवितहानी होण्याची वाट न बघता याकडे लक्ष द्यावे व लवकरात लवकर खड्डे बुजवावे, अशी मागणी यावेळी केली. विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यात स्वाती पाटील, सरिता निंबाळकर, अनिता वाघ, हर्षदा मराठे, अनिता घोडके, संतोष पेलमहाले, स्वप्निल जाधव, प्रमोद घोलप, सागर त्रिभुवन, प्रथमेश भांगरेे, करण भिसे यांनी सहभाग घेतला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -