घरताज्या घडामोडीरायगडात जिल्ह्यात पक्षबांधणीला लागा; प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या महेंद्र घरत यांना सूचना

रायगडात जिल्ह्यात पक्षबांधणीला लागा; प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या महेंद्र घरत यांना सूचना

Subscribe

नाना पटोले यांनी रायगडचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल महेंद्र घरत यांचे अभिनंदन केले

रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कामगारनेते महेंद्रशेठ घरत यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. नाना पटोले यांनी रायगडचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल महेंद्र घरत यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानिमित्त पटोल यांनी घरत यांना रायगडमध्ये पक्ष बांधणीसाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढून सर्व सेलच्या अध्यक्षांच्या सहकार्याने जिल्ह्यात चांगली पक्षबांधणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, पनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कटेकर, खालापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नाना म्हात्रे, अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर, श्रीवर्धन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आझाद भाई, उरण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रेखा घरत, अलिबाग महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुजाता पाटील, निर्मला पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, कृष्णा पारंगे, कोकण विभाग मच्छिमार सेलचे अध्यक्ष मार्तंड नाखवा, अखलाक शिलोत्री, उरण तालुका इंटकचे अध्यक्ष संजय ठाकूर,महाराष्ट्र राज्य संयोजक प्रविण कांबळे, महाराष्ट्र राज्य ओबीसीसेलचे सरचिटणीस उमेश भोईर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव निखिल डवले, रायगड जिल्हा एनएसयूआयचे अध्यक्ष कुणाल जाधव, मुरलीधर ठाकूर, अंगद ठाकूर, योगेश रसाळ, आनंद ठाकूर, विवेक म्हात्रे इत्यादी उपस्थित होते.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सेनेला धक्का, भाजपमध्ये जाणाऱ्यांची यादी तयार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -