घरताज्या घडामोडीगलवान प्रांतातील चिनी हल्ला हा पूर्वनियोजित कट!

गलवान प्रांतातील चिनी हल्ला हा पूर्वनियोजित कट!

Subscribe

अमेरिकन काँग्रेसच्या अहवालाचा निष्कर्ष

चीनने गलवान प्रांतात भारतीय जवानांवर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. आपल्या सैन्यासाठी स्ट्रॅटेजिकल रूट तयार करण्याच्या कुटील हेतूने चीनने हा हल्ला केला, असा निष्कर्ष अमेरिकन काँग्रेसने सादर केलेल्या अहवालातून काढण्यात आला आहे. जून महिन्यात गलवान खोर्‍यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चिनी सैनिकही ठार झाले होते.

गलवानमधील हिंसक चकमक पूर्वनियोजित होती आणि याचे सबळ पुरावेही आहेत. या अहवालात अमेरिकेने म्हटले आहे, की चीनला जमिनीवरच कब्जा करायचा असता, तर त्याने अशा चकमकीऐवजी संपूर्ण लढाईच केली असती. मात्र, गलवान हिंसक चकमकीचे कारण या अहवालात स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेले नाही. पण चीनने आपल्या सैन्यासाठी स्ट्रॅटेजिक रूट तयार करण्याच्या हेतूने ही चकमक घडवून आणली, असा अंदाज लावण्यात आला आहे.

- Advertisement -

चीनने भारतासह आपल्या ज्या शेजारील देशांचे अमेरिकेसोबत चांगले व्यापारी संबंध आहेत, अशा देशांना लक्ष्य केले आहे. या अहवालात चीनविरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याची मागणीही करण्यात आली आहे. अर्थात, डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर ज्यो बायडन यांच्यासमोर हे एक मोठे आव्हान असेल. एवढेच नाहीतर पाकिस्तानच्या लष्करातील चीनची दखलही मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचेही या अहवालात म्हणण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -