घरठाणेनादुरुस्त बॅटरीने काढली विजेवरील एकमेव बसची हवा; ९९ बसेसच्या प्रतीक्षेत ठामपा

नादुरुस्त बॅटरीने काढली विजेवरील एकमेव बसची हवा; ९९ बसेसच्या प्रतीक्षेत ठामपा

Subscribe

ती बस ही भविष्यात भंगारात काढावी लागणार का?. असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

पर्यावरण समतोल राखण्याबरोबर ठाणेकर नागरिकांना दर्जेदार सुविधेसाठी विजेवर धावणाऱ्या बसेस लोकसहभागातून घेण्याचा धाडसी निर्णय ठाणे महापालिकेने घेतला खरा. त्यातच एकमेव मिळालेल्या बसेसचे प्रायोगिक तत्वावर लोकार्पण करून गाजावाजा केला. पण आलेल्या एकमेव बसची हवा मात्र त्या बसच्या नादुरुस्त झालेल्या बॅटरीनेकाढल्याने ती बस गेल्या वर्षभरापासून धूळखात एकाच जागी उभी असल्याची बाब समोर आली आहे. त्यातच ९९ बसेस न आल्याने प्रदूषणविरहित बसेसमधून दर्जेदार प्रवास सेवा देण्याचे दिवसाढवळ्या स्वप्न दाखविणाऱ्या महापालिका प्रशासनाला आता तोंडावर पडल्यासारखे झाले आहे.

ठाणे महापालिकेच्या परिवहन समिती सेवेच्या नादुरुस्त आणि जुन्या बसेसच्या रडगाण्याने नेहमीच महापालिका प्रशासन नागरिकांच्या टीकेची धनी बनत आहे. या टीकेतून सुटका व्हावी आणि  ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि पर्यावरणस्नेही करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मध्यंतरी घेतला होता. या निर्णयानुसार प्रदूषणविरहित अशा विजेवर धावणाऱ्या शंभर बसेस एकही पैसे खर्च न करता खासगी लोकसहभागातून घेण्याच ठरवले. अशाप्रकारे या प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाने दावा करताना ठाणेकर नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासोबत पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच या प्रकल्पांतर्गत असलेल्या १०० बसेपैकी एक बस ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीच्या ताफ्यात दाखल झाली.

- Advertisement -

त्यानंतर ठाण्याचे तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ६ जून २०१८ रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्या बसचे मोठा गजावाज करून लोकार्पण करत ती बस ठाणे ते बोरिवली या महत्वाच्या मार्गावर धावू लागली होती.मात्र उर्वरित बसेस आज येतील उद्या येतील असे वाटत असतानाच लोकार्पण केलेली एकमेव बस नादुरुस्त झाल्याने ती कोपरी,आनंदनगर येथील टीएमटीच्या आगारात उभी करून ठेवली आहे. तेंव्हापासून आजतागायत ती बस तेथे बॅटरी दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच, दुरुस्तीचा खर्च जास्त असल्याने तो खर्च ठेकेदारांच्या खिशाला परवडणारा नसल्याने ती बस अजून किती दिवस उभा केली जाणार आहे. तसेच ती बस ही भविष्यात भंगारात काढावी लागणार का?. असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

” विजेवरील बस नादुरुस्त झाल्याने बंद आहे. याबाबत दुजोरा देताना, त्या बसची बॅटरी नादुरुस्त झाल्याने ती बंद पडली आहे. त्या दुरुस्तीबाबत संबंधित ठेकेदाराला सांगण्यात आले आहे. तसेच अद्यापही ९९ बसेस आलेल्या नसून त्याचा पाठपुरावा सुरू आहे .

- Advertisement -

– विनोद गुप्ता ,उपनगर अभियंता, विद्युत विभाग, ठामपा


हेही वाचा – अयोद्धेचे राम मंदिर २०२३मध्ये भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -