रायगडावर पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू

tourist dies of heart attack at raigad fort
रायगडावर पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू

हिवाळा सुरु झाला की अनेक जण पिकनिकचा प्लॅन करतात. किल्ले किंवा थंड वातावरण असलेल्या पर्यटन स्थळी जात असतात. पण यंदा कोरोना असल्यामुळे पर्यटक नेहमीप्रमाणे पर्यटन स्थळावर गर्दी करत नाही आहेत. दरम्यान दिवाळीनिमित्ताने किल्ले सजवले जातात. यावर्षी रायगड सजवताना एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतून रायगडावर गेलेल्या शिवप्रेमींपैकी एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे.

या पर्यटकाचे नावे रमेश गुरव असे असून ते मुंबई विद्याविहार येथे राहतात. दिवाळीनिमित्ताने रमेश गुरव त्यांच्या मित्रांसोबत रायगडावर गेले होते. आठ जणांचा ग्रुप होता. किल्ल्यावर पणत्या लावण्यासाठी निघाले होते, त्या दरम्यान किल्ल्यावर पायऱ्या चढत असताना रमेश यांच्या प्रकृती बिघडली. त्यामुळे उपचाराकरिता पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून झाल्यावर त्यांना महाड मधील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचे आले. पण त्यांच्या प्रकृती जास्त बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या हृदयविकाराच्या झटक्यांने रमेश गुरव यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – पती आणि पत्नीचा वेगळा रक्तगट असूनही किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी