घरक्राइमखळबळजनक! शौचालयास गेलेल्या बहिणींचे आढळले मृतदेह, एक हायवेवर तर दुसरा झाडावर लटकवलेला

खळबळजनक! शौचालयास गेलेल्या बहिणींचे आढळले मृतदेह, एक हायवेवर तर दुसरा झाडावर लटकवलेला

Subscribe

रात्री शौचालयास गेलेल्या दोन सख्या बहिणी अचानक गायब झाल्या. काही वेळानंतर दोन बहिणींचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले. एकीचा मृतदेह हायवे लगतच्या रस्ताच्या किनारी पडलेला मिळाला. तर दुसरीचा मृतदेह झाडावर लटकवलेला आढळला. ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यात घडली आहे. सोमवारी रात्री या दोन बहिणी अचानक गायब झाल्या होत्या. दरम्यान दोघींच्या गळ्यावर निशाण आढळले असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. सध्या याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांना माहिती न घेता मृतदेहाचा घेतला शोध

बिलसंडा ठाणे क्षेत्रातील गाव बिलासपूर रहिवासी कमला देवीने सांगितले की, ‘तिचा नवरा भूपराम शर्माचे निधन झाले आहे. ती कुटुंबासोबत बीसलपूरच्या जसोली गावमधील विट भट्टीवर मजूरी करते आणि जवळच झोपडी बनवून राहते.’ पण सोमवारी रात्री सात वाजता कमला देवीची २० वर्षांची मुलगी पूजा आणि १७ वर्षांची मुलगी अनिष्का या दोघीजणी शौचासाठी जवळच्या शेतात गेल्या होत्या. त्यानंतर दोघी बहिणी गायब झाल्या. बऱ्याच वेळानंतर मुली घरी आल्या नाही म्हणून आई कमला देवीने आपल्या इतर मजदूर लोकांसोबत त्यांच्या शोध घेतला. तेव्हा रात्री साडे अकराच्या सुमारास छोटी मुलगी अनिष्काचा मृतदेह विट भट्टीपासून शंभर मीटर दूर असलेल्या पीलीभीत-बीसलपूर मार्गावरील रस्त्याच्या किनारी आढळला. तिच्या गळ्यावर निशाण दिसले. मग तो मृतदेह उचलून ते घरी घेऊन गेले. मृतदेह घरी ठेवल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती न देता दुसऱ्या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

निलगिरीच्या झाडाला आढळला दुसऱ्या बहिणीचा मृतदेह

मंगळवारी सकाळी जवळपास सहा वाजता भट्टीपासून दोनशे मीटर दूर एका उसाच्या शेतामध्ये निलगिरीच्या झाडावर पूजाचा मृतदेह लटकवलेला सापडला. त्यानंतर याघटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. काही वेळानंतर एसपी जयप्रकार, एएसपी डॉ.पवित्र मोहन त्रिपाठी पोलीस दलासोबत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लटकवलेला मृतदेह झाडावरून खाली उतरवला. घटनास्थळी आढळलेला एक मोबाईल पोलिसांना जप्त केला आहे. डॉग स्क्वॉड आणि फील्ड युनिट टीम बोलावले आहे. दोन्ही बहिणींचा गळा दाबून हत्या केल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


हेही वाचा – अनैतिक संबंधाच्या संशयामुळे बायकोच्या प्रायव्हेट पार्टला नवऱ्यानेच लावले एल्युमिनियम तारेचे टाके!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -