घरअर्थजगत₹ 2000 Note : आतापर्यंत बँकांकडे किती नोटा जमा झाल्या? आरबीआय गव्हर्नरने...

₹ 2000 Note : आतापर्यंत बँकांकडे किती नोटा जमा झाल्या? आरबीआय गव्हर्नरने दिली माहिती…

Subscribe

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) 2000 रुपयांच्या नोटा (₹ 2000 Note) चलनातून बाद करण्याचा निर्णय 19 मे 2023 रोजी जाहीर केला. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच, 23 मे 2023पासून प्रत्यक्षात नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरू केली. आता जवळपास 15 दिवसांत विविध बँकांमध्ये किती नोटा जमा झाल्या, याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी दिली.

- Advertisement -

आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेत असल्याचे जाहीर करतानाच या नोटा 30 सप्टेंबर 2023पर्यंत बँकांमध्ये जाऊन बदलण्याचे आवाहन करण्यात आले होते. तोपर्यंत ही नोट व्यवहारांसाठी वैधच राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. आरबीआयचा 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. आता 2000 रुपयांच्या नोटा बदलून जमा केल्या जातील आणि या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासंदर्भात बँकांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही आरबीआयने सांगितले होते.

85 टक्के नोटा ठेवीच्या रूपात जमा
गेल्या महिन्यात 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यानंतर जवळपास निम्म्या नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत. यावर्षी 31 मार्च रोजी देशात 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. त्यातील निम्म्या नोटा परत आल्या म्हणजे 1.80 कोटी रुपये परत आले आहेत. या परत आलेल्या नोटांपैकी 85 टक्के नोटा ठेवीच्या रूपात जमा करण्यासाठी आल्या असून उर्वरित नोटा बदलण्यात आल्या, अशी माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

- Advertisement -

नोव्हेंबर 2016मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नोटाबंदीनुसार 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरबीआयने 2000 हजार रुपयांची नोट चलनात आणली. 2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.

विरोधकांची टीका
आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी टीकेची झो़ड उठवली. आमचे नेते आधी कृती करतात, नंतर विचार करतात. आपल्या स्वयंघोषित विश्वगुरूंचे हे वैशिष्ट्य असल्याची टीका काँग्रेसने केली. म्हणूनच आम्ही म्हणतो की, पंतप्रधान सुशिक्षित असावा, असे टोला आम आदमी पार्टीने लगावला. तर, काही लोकांना त्यांची चूक उशिरा समजते. 2000 रुपयांच्या नोटेच्या बाबतीतही असेच घडले आहे, अशी टीका समाजवादी पार्टीने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -