घरअर्थजगतरेल्वे मालवाहतुकीच्या उत्पन्नात 16 टक्क्यांची वाढ; नोव्हेंबरपर्यंत 978.72 मे. टन वाहतूक

रेल्वे मालवाहतुकीच्या उत्पन्नात 16 टक्क्यांची वाढ; नोव्हेंबरपर्यंत 978.72 मे. टन वाहतूक

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशातील सर्वात मोठी मालवाहतूकदार म्हणून काम करत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीने गेल्या वर्षातील याच कालावधीमधील मालवाहतूक आणि उत्पन्नाला मागे टाकले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळवलेल्या महसुलाच्या तुलनेत यावर्षी मालवाहतुकीच्या उत्पन्नात 16 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.


एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये 978.72 मेट्रिक टनांची एकूण मालवाहतूक झाली, गेल्या वर्षी याच कालावधीत ही मालवाहतूक 903.16 मेट्रिक टन होती. त्यामुळे रेल्वेने यावर्षी 1,05,905 कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 91,127 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत या वर्षीच्या महसुलात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे.

- Advertisement -

नोव्हेंबर 22मध्ये 123.9 मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली. गेल्यावर्षी याच महिन्यात 116.9 मेट्रिक टन मालवाहतूक झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात मालवाहतुकीत 5 टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात 13,560 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मिळालेल्या 12,206 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबर महिन्यातील महसुलात 11 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि तत्पर धोरणाचे पाठबळ
“हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून भारतीय रेल्वेने आपल्या सेवांच्या पुरवठ्यामध्ये स्पर्धात्मक दरांवर सुधारणा करण्याबरोबरच व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे रेल्वेकडे नेहमीच्या आणि नेहमीपेक्षा वेगळ्या अशा दोन्ही मालवाहतुकीचा नवा ओघ वळला आहे. ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि तत्पर धोरणाचे पाठबळ असलेल्या व्यवसाय विकास युनिट्सच्या कामामुळे रेल्वेला ही उल्लेखनीय कामगिरी करणे शक्य झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आता प्रशासकीय कामकाज ‘पेपरलेस’ होणार, ‘ई-ऑफिस’ प्रणालीला सुरुवात करणार; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -