FD पेक्षा या शेअर्समधून मिळतेय दुप्पट कमाईची संधी, जाणून घ्या कशी?

After doubling in a year, KNR Construction set for next leg of rally
FD पेक्षा या शेअर्समधून मिळतेय दुप्पट कमाईची संधी, जाणून घ्या कशी?

भविष्यकालीन गुंतवणूकीसाठी अनेक पर्याय सध्या बाजारात उपलब्ध होत आहे. परंतु कमी वेळात अधिक पैसा कमावण्यासाठी बहुतेक जण स्वत:च्या रिस्कवर शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहे. यात अनेक छोट्या कंपन्यांच्या शेअर्सलाही बाजारात मोठी मागणी आहे. यातील वेल डायव्हर्सिफाइड इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कंपनी आणि केएनआर कंस्ट्रक्शन ( KNR Construction) च्या शेअर्सने मागच्या १२ महिन्यात मोठी झेप घेतली आहे. यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संपत्ती दुपटीने वाढली आहे. जेव्हा निफ्टीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा थोडी जास्त वाढ झाली असतानी कमाईची संधी मिळाली.

२०२१ च्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत KNR Construction ने निफ्टीपेक्षा चांगले प्रदर्शन केले. सध्या KNR Construction च्या स्टॉकमधून ३७ टक्के रिटर्न मिळत आहेत. तर निफ्टीमध्ये १३ टक्क्यांची वाढ पाहायला मिळतेयंय ( याच काळात BSE 500 इंडेक्स १८ टक्क्यांनी वधारला आहे ). कंपनीचा मार्केट कॅप ६२०० कोटी रुपये झाला आहे. तर याने २ मार्च २०२१ ला २४२.१० रुपयांचा ५२ आठवड्याचा नाव हाय टच केला होता.

रिलायन्स सक्युॅरीटीजच्या (Reliance Securities) च्या जतिन गोहिल (Jatin Gohil) यांच्या म्हणण्यानुसार, या स्टॉकमध्ये फ्लॅग पॅटर्न पाहायला मिळाला,. त्यामुळे हालिया ब्रेकआउटला ३०० रुपयांच्या टार्गेटपर्यंत नेऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. ही वाढ २२० रुपयांची असून २८ जूनच्या क्लोजिंगपासून ती ३६ टक्के अपसाइट दाखवत आहे. त्यामुळे लॉन्ग टर्म गुंतवणूकदार (दीर्घकालीन गुंतवणूक) या स्टॉकममध्ये येत्या ६ ते ९ महिन्यांपर्यंत वाढ होणार असल्याने थांबू शकता. तसेच या स्टॉकला ब्रेक आउट मिळाल्यामुळे हा स्टॉक आणखी वर जाऊ शकतो असा अंदाज गोहिल यांनी वर्तवला आहे.

जतिनगोहिल यांनी या शेअरमध्ये वर्तमान काळात लॉन्ग पोझिशन घ्यायचा सल्ला दिला आहे. जर तुम्हाला हा स्टॉक २०८ रुपयांच्या आसपास मिळतो तर आणखी चांगले असेल. सोबतच ३०० रुपयांचे टार्गेट ठरवून १८८ रुपयांवर स्टॉपलॉस नक्की लावा असा सल्लाही गोहिल यांनी दिला आहे.