घरअर्थजगतBudget 2023: ग्रीन ग्रोथ म्हणजे काय? ज्याने कार्बनची तीव्रता कमी होईल आणि...

Budget 2023: ग्रीन ग्रोथ म्हणजे काय? ज्याने कार्बनची तीव्रता कमी होईल आणि ग्रीन जॉबच्या संधी मिळतील

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सरकारचे लक्ष ग्रीन ग्रोथवर असल्याचे सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सरकारचे लक्ष ग्रीन ग्रोथवर असल्याचे सांगितले. ग्रीन ग्रोथ लक्षात घेऊन सरकार अनेक कार्यक्रम राबवत आहे. देशातील विविध आर्थिक क्षेत्रात ऊर्जेचा अधिक चांगला वापर करण्यासाठी हरित इंधन, हरित ऊर्जा, हरित शेती, ग्रीन मोबिलिटी, ग्रीन बिल्डिंग, हरित उपकरणे यांसारखे अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रीन ग्रोथच्या दिशेने उचलल्या जाणाऱ्या या पावलांमुळे वातावरणातील कार्बनची तीव्रता कमी होण्यास मदत होईल आणि यासोबतच ग्रीन जॉबच्या संधीही उपलब्ध होतील.

ग्रीन ग्रोथ म्हणजे काय?
ग्रीन ग्रोथ ही संकल्पना म्हणजे अशा प्रकारची आर्थिक प्रगती आणि विकास ज्यामध्ये नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्यात आला. तसंच ज्यावर आपले कल्याण आधारित आहे, अशी संसाधनं आणि सुविधा प्रदान करतात. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी गुंतवणूक आणि नावीन्य यांचा योग्य मिलाफ करून नवीन आर्थिक संधी निर्माण करणे आवश्यक आहे. इथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की ग्रीन ग्रोथ आणि सस्टेनेबल ग्रोथ यात फरक आहे.

- Advertisement -

भारताच्या विकासात नेत्रदीपक वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात भारत ही जगातील अशा अर्थव्यवस्थांपैकी एक मानली जाते ज्यांनी यातून झपाट्याने सावरले आहे आणि त्यात क्वचितच घट झाली आहे. मात्र गेल्या काही दशकांपासून भारताच्या विकासाचा पर्यावरणावर अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, प्रदूषणामुळे भारताला ८० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

देशाचे सरकार ग्रीन हायड्रोजन मिशनवर सतत काम करत आहे. यावेळी अर्थसंकल्पातही याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, सरकार हरित क्रांतीसाठी सतत काम करत आहे. यासाठी राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान सुरू करण्यात आले आहे. ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी सरकारने १९,७४४ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

- Advertisement -

ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय?
ग्रीन हायड्रोजन हे सर्वात स्वच्छ इंधन मानले जाते. याचे कारण असे की, त्याचे उत्पादन किंवा वापर करून कोणताही कार्बन फूटप्रिंट शिल्लक राहत नाही. हायड्रोजन निसर्गात अगदी सहज सापडतो, इतर घटकांच्या कॉम्बिनेशनमध्ये तो उपलब्ध असतो. पाण्याप्रमाणे ते ऑक्सिजनसह उपलब्ध असतं. म्हणजेच ते पाण्यापासून वेगळे केले जाऊ शकते. या प्रक्रियेला इलेक्ट्रोलिसिस म्हणतात.

वारा, पाणी किंवा सौरऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जा वापरून पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन केले जाते आणि हायड्रोजन काढला जातो, त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणतात. ग्रीन हायड्रोजन उत्पादनामध्ये राखाडी हायड्रोजनपेक्षा लक्षणीय प्रमाणात कार्बन उत्सर्जन कमी होते. ग्रीन हायड्रोजनचा वापर विद्युतीकरणासाठी कठीण असलेल्या भागांना डीकार्बोनाइज करण्यासाठी केला जाऊ शकतो. जसे की स्टील उत्पादन, सिमेंट उत्पादन इ. यामुळे हवामानातील बदल मर्यादित होण्यास मदत होईल. सध्या तेल शुद्धीकरण, पोलाद, खते, मोठ्या प्रमाणात रसायने अशा मोठ्या उद्योगांमध्ये हायड्रोजनचा वापर केला जातो. कार्बन उत्सर्जनाची भरपाई करण्यासाठी CNG आणि PNG सोबत मिश्रण करणे महत्त्वाचं ठरू शकतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -