घरअर्थजगतकिसान क्रेडिट कार्डद्वारे दिलेल्या कर्जावर सबसिडी मिळणार

किसान क्रेडिट कार्डद्वारे दिलेल्या कर्जावर सबसिडी मिळणार

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँके(RBI)ने मत्स्यपालन आणि पशुपालन करणार्‍या शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्डाद्वारे दिल्या जाणार्‍या कर्जावर 2 टक्क्यांची व्याजदराच्या स्वरूपात सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. व्याज अनुदाना(Interest Subvention)बरोबरच छोट्या कालावधीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणार्‍या अशा शेतकर्‍यांना 7 टक्के व्याजदरावर सबसिडी मिळणार आहे. 2018-19 आणि 2019-20मध्ये कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना या योजनेचा फायदा होणार आहे. मोदी सरकारनं फक्त पशुपालन आणि मत्स्यपालन करणार्‍यांसाठी किसान क्रेडिट कार्डाची सुविधा दिली आहे.

तसेच वेळेवर कर्ज चुकवणार्‍या शेतकर्‍यांच्या व्याजावर 3 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. हे नियम लागू झाल्यानंतर शेतकर्‍यांना वर्षं 2018-19 आणि 2019-20 घेतलेल्या कर्जावर फक्त 4 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. आरबीआयनं या व्याज सबसिडीच्या सवलतीचा फायदा 2 लाखांपर्यंत कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या सवलतीचा फायदा मत्स्यपालन आणि पशुपालन करणार्‍या शेतकर्‍यांनाच मिळणार आहे. जे शेतकरी केसीसी पीक कर्ज (Crop Loan) घेत आहेत आणि मत्स्यपालन आणि पशुपालनसारखे शेतीपूरक व्यवसाय करत आहेत, त्यांना याचा फायदा होणार आहे. पीक कर्ज (Crop Loan) आणि मत्स्यपालन-पशुपालन करणार्‍या शेतकर्‍यांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर या योजनेंतर्गत फायदा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -