घरअर्थजगतUAN नंबर विसरलायत 'नो टेंन्शन', या सोप्या स्टेप फॉलो करता काढा PF

UAN नंबर विसरलायत ‘नो टेंन्शन’, या सोप्या स्टेप फॉलो करता काढा PF

Subscribe

कोरोना काळात अनेक जण प्रॉविडेंट फंडमधील आपले पैसे काढत आहेत. (Provident Fund) परंतु हे पैसे काढताना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN)लक्षात नसल्याने पैसे काढताना अनेक अडचणी येत आहेत. परंतु UAN नंबर विसरलात तरी आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) यासाठी आपल्या सिस्टममध्ये मोठे बदल केले आहेत. ज्यामुळे तुम्ही अकाउंटहोल्डर विना UAN आपल्या पीएफ अकाउंटचा बॅलेन्स चेक (PF Balance Check) करू शकता. त्यामुळे युएएन नंबर शिवाय पैसे काढू शकता. १२ डिजीटमध्ये हा युएएन नंबर असतो. जो ईपीएफओ सब्सक्रायबर्सला दिला जातो. हा नंबर कधीही चेंड होत नाही. परंतु या UAN नंबर शिवाय कसा पीएफ काढता येईल असा प्रश्न पडला असेल ना आम्ही तुम्हाला काही सोप्प्या स्टेप सांगतो त्या फॉलो करत तुम्ही तुमचा पीएफ काढू शकता.

UAN शिवाय चेक करा तुमचा अकाउंट बॅलेन्स

१) UAN शिवाय पीएफ बॅलेन्स चेक करण्यासाठी सर्वप्रथम epfindia.gov.in वर लॉगइन करा.

- Advertisement -

२) त्यानंतर Click Here to Know your EPF Balance वर क्लिक करा.

३) epfoservices.in/epfo/ वर रिडायरेक्ट करेल. त्यानंतर Member Balance Information टॅबवर क्लिक करा.

- Advertisement -

३) Memberने आपले राज्य सिलेक्ट करत EPFO ऑफिस लिंकवर क्लिक करा.

४) PF नंबर, नाव, रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.

५) सर्व माहिती भरल्यानंतर Submit वर क्लिक करा. स्क्रिनवर पीएफ बॅलेन्स डिसप्ले होईल.

असे काढा PF अकाउंटमधून पैसे

१) सर्वप्रथम EPFO वेबसाईट epfindia.gov.in/memberinterface/ वर जा.

२) त्यानंतर UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगइन करा. मॅनेजवर क्लिक करा.

३) KYC ऑप्शनवर आपली माहिती चेक करा. ऑनलाईन सर्विसवर क्लिक करा. एक ड्रॉप मेन्यू ओपन होईल.

४) क्लेमवर (Claim) क्लिक करत आपला क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी Proceed For Online Claim वर क्लिक करा.

५) त्यानंतर I Want To Apply For मध्ये जा. यात full EPF Settlement, EPF Part withdrawal (loan/advance) किंवा pension withdrawal ऑप्शन निवडा.

ही सर्व माहिती भरल्यानंतर ५ ते १० दिवसांत ईपीएफओवर रजिस्टर्ड बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतील. याची माहिती तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर SMS द्वारेही मिळेल.

UAN शिवाय कसे काढाल पैसे 

UAN नंबर विना तुम्हाला पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी पीफ ऑफिसमध्ये जाऊन पीएफ फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म पूर्ण भरून पुन्हा पीएफ ऑफिसमध्ये जमा करावा लागेल. यासाठी तुम्हाला ऑनलाईन आधार बेस्ड क्लेम फॉर्म किंवा नॉन-आधार क्लेम फॉर्म डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म भरुन युजर आपल्या पीएफ अकाउंटमधून अर्धी किंवा पूर्ण रक्कम काढू शकतात.


पुण्यातील नियम मोडणाऱ्या ‘या’ तीन बँकांवर RB ने ठोठावला लाखोंचा दंड

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -