घरअर्थजगत"आर्थिक जबाबदारी झटकण्याची गो फर्स्टची पहिलीच वेळ नाही", अमेरिकन कंपनीचे गंभीर आरोप

“आर्थिक जबाबदारी झटकण्याची गो फर्स्टची पहिलीच वेळ नाही”, अमेरिकन कंपनीचे गंभीर आरोप

Subscribe

मुंबई | गो फर्स्ट (Go First Airlines) ही विमान कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामुळे गो फर्स्ट कंपनीने अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. गो फर्स्टने प्रॅट अँड व्हिटनी (Pratt & Whitney) या अमेरिकन कंपनीने लवादाच्या निर्णयाचे पालन केले असते तर, वाडिया समूहाची गो फर्स्ट एअरलाईन्स आर्थिक संकटात सापडली नसती, असा आरोप प्रॅट अँड व्हिटनी अमेरिकन कंपनीने गो फर्स्टवर केले आहे.

प्रॅट अँड व्हिटनी कंपनी म्हटले की, “आमची एअरलाईन्स कंपनी ग्राहकांच्या यशासाठी वचनबद्ध आहे. आम्ही सर्व ग्राहकांसाठी वितरण वेळापत्रकांना प्राधान्य देत आहोत. प्रॅट अँड व्हिटनी कंपनीने मार्च २०२३ च्या गो फर्स्टशी संबंधित लवादाच्या निर्णयाचे पालन करत आहे. हा आता खटल्याचा विषय असल्याने त्यासंदर्भात भाष्य करणार नाही. परंतु, गो फर्स्टसोबत असे काही घडण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आर्थिक जबाबारी झटकण्याचा कंपनीचा मोठा इतिहास राहिला आहे”, अशी माहिती प्रॅट अँड व्हिटनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण

- Advertisement -

प्रॅट अँड व्हिटनी या अमेरिकन कंपनीने लवादाच्या निर्णयाचे पालन केले असते तर वाडिया समूहच्या गो फर्स्ट एअरलाईन्स कंपनी आर्थिक संकटात सापडली नसती. सिंगापूर लवाद न्यायालयाने प्रॅट अँड व्हिटनी कंपनीला दिलेल्या आदेशानुसार, “२७ एप्रिलपर्यंत किमान १० अतिरिक्त भाडेतत्त्वावर दिलेली इंजिने आणि डिसेंबर २०२३ पर्यंत दरमहा आणखी १० अतिरिक्त भाडेतत्त्वावर दिलेली इंजिने देण्यासाठी सर्व योग्य पावले उचलण्याचे आदेश दिले होते.” प्रॅट अँड व्हिटनी कंपनीला दिलेल्या सूचनांचे पालन केले असते तर, गो फर्स्ट ऑगस्ट-डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण ऑपरेशन्समध्ये परतली असती.

हेही वाचा – ‘या’ कारणामुळे गो फर्स्ट एअरलाइन्सला DGCA ने बजावली नोटीस

तीन वर्षात ३,२०० कोट्यावधी रुययांची गुंतवणूक

गेल्या तीन वर्षांत गो फर्स्टच्या भागीदारांनी एअरलाईन्समध्ये ३, २०० कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यापैकी २४०० कोट्यावधी रुपये २४ महिन्यांत गुंतले आहेत. या वर्षी एप्रिल महिन्यात आणखी २९० कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. या कंपनीच्या स्थापनेपासून मालकांनी ६,५०० कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

दोन विमानाने भाडेतत्त्वावर घेऊन गो फर्स्ट एअलाईन्स सुरू

वाडिया समूह गो फर्स्ट या विमान कंपनीमध्ये भांडवल उभारणीसाठी अनेक गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. परंतु, अद्यापही कोणत्याही गुंतवणूकदारांकडून निर्णय आलेला नाही. कंपनीला आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे मसुदा सादर केला आहे. गो फर्स्ट ही एअरलाईन्स जेह वाडियाने २००५ मध्ये सुरू केली. त्यावेळी गो फर्स्टकडे फक्त दोन विमाने होती. आणि ही विमाने भाडेतत्त्वावर होती.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -