इंडिगो विमानातून करा ९९९ रुपयांत प्रवास

Indigo Airlines

हवाई सफर करणार्‍या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. इंडिगो विमान कंपनीने आपल्या 13 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांसाठी एक सेल आणला आहे. या सेलच्या माध्यमातून इंडिगोने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान प्रवासासाठी सवलत आणली आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठी कमीतकमी 999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 3499 रुपये इतका तिकीट दर कंपनीकडून करण्यात आला आहे.

इंडिगो कंपनीच्या 999 आणि 3499 रुपयांच्या ऑफरसाठी आजपासून बुकिंग सुरू असून 4 ऑगस्ट 2019 पर्यंत करता येणार आहे. कंपनीकडून या ऑफरची माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे की, 15 ऑगस्ट 2019 ते 28 मार्च 2020 च्या दरम्यान प्रवाशांसाठी मर्यादित असणार आहे.

याचबरोबर, कंपनीकडून या वार्षिक सेल ऑफरसाठी किती सीट्स असणार आहेत, हे सुद्धा सांगण्यात आले आहे. ही ऑफर प्रस्थान (departure) च्या तारखेपासून कमीत कमी 15 दिवस आधी आणि ऑफर काळात बुकिंग केल्यानंतर स्वीकारली जाईल. तसेच, देशांतर्गत प्रवास करणार्‍यांसाठी बुकिंगच्यावेळी बँक ऑफ बडोदाच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्यास कॅशबॅकची ऑफर उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बुकिंग करताना येस बँकचे क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक मिळणार आहे.