घरअर्थजगतटपाल विभागासाठी पेन्शन अदालत

टपाल विभागासाठी पेन्शन अदालत

Subscribe

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘पेन्शन अदालत’ आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे.त्यानुसार मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे शुक्रवार 23 ऑगस्ट 2019 ला पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंबिय निवृत्ती वेतनधारकांसाठी मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, दुसरा माळा, जीपीओ भवन, मुंबई 400001 येथे सकाळी 11 वाजता पेन्शन अदालत होईल.

निवृत्तीवेतनधारकांनी पुढील प्रपत्रात आपल्या तक्रारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, दुसरा माळा, जीपीओ भवन, मुंबई-400001 यांना 23 जुलै 2019 पर्यंत पाठवाव्यात. 23 जुलै 2019 नंतर प्राप्त पत्रांचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -