घरअर्थजगतरिलायन्सचा विक्रम, कंपनीचे बाजारमूल्य १६ लाख कोटींवर

रिलायन्सचा विक्रम, कंपनीचे बाजारमूल्य १६ लाख कोटींवर

Subscribe

रिलायन्सचे आजचे बाजार मूल्य १६ लाख कोटींच्या पार

आजच्या शेअरमार्केट मध्ये जोराची तेजी बघायला मिळत आहे. सेन्सेक्सने ५८ हजार अंशांचा टप्पा गाठला आहे.आजच्या शेअर बाजारात रिलायन्स कंपनीचा मोठा सहभाग असून रिलायन्सच्या नावे आज नवीन विक्रम नोंदवला गेला.

रिलायन्स कंपनीचा शेअर आज दुपारी ३.५ टक्क्यांच्या तेजीने २,३६८ रुपयांपर्यंत व्यवहार करत होता, आज शुक्रवार अखेर २३८९.६५ रुपये प्रति शेअर पर्यंत होता. हि आज पर्यंतच्या शेअरमार्केट मधील विक्रमी पातळी ठरली आहे. १६ लाख कोटींच्या पार कंपनीचे बाजार मूल्य पोहचले आहे. जस्ट डायल कंपनीमध्ये रिलायन्स कंपनीने कंट्रोलिंग स्टेक खरेदी केली आहे.रिलायन्सने आणखी २५.३५ टक्के हिस्सा विकत घेतला आहे.रिलायन्सचा जस्ट डायलमध्ये ४०.९८ टक्के हिस्सा झाला आहे. शेअरमार्केट मधील रिलायन्सच्या विक्रमी पातळी मुळे भागभांडवलात चांगल्या प्रमाणत तेजी आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -