घरअर्थजगत'या' सात घटकांवर म्हणजेच 'सप्तर्षी'वर आधारित आहे यंदाचं Budget 2023

‘या’ सात घटकांवर म्हणजेच ‘सप्तर्षी’वर आधारित आहे यंदाचं Budget 2023

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी 'सप्तर्षी' 'चा अनेकवेळा उल्लेख केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी ‘सप्तर्षी’ ‘चा अनेकवेळा उल्लेख केला. हा बजेट सप्तर्षी मिशनवर असल्याचं त्यांनी म्हटलंय. काय आहे सप्तर्षी मिशन आणि कोणते आहे ते महत्त्त्वाचे सात घटक जाणून घेऊयात…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सात गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने सात घटकांना महत्त्व दिले असून येत्या वर्षभरात यावर काम करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प ‘सप्तर्षी’ या सात घटकांवर आधारित आहे.

- Advertisement -

अर्थसंल्पाचे सात प्राधान्यक्रम- सप्तर्षी

1. सर्वसमावेशक विकास
2. शेवटच्या घटकापर्यंत विकास
3. पायाभूत सुविधांचा विकास
4. क्षमतांमध्ये वाढ करणे
5. ग्रीन ग्रोथ
6. युवाशक्ती
7. आर्थिक क्षेत्र

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या आठ ते दहा राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारताचा हा अर्थसंकल्प अशा वेळी सादर केला जात आहे जेव्हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था मंदावल्या आहेत आणि संभाव्य मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण जगाच्या नजरा मोदी सरकारच्या बजेटकडे लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -