घरअर्थजगतबँकांच्या सुट्टीच्या दिवशीही खात्यात जमा होणार पगार; पेंशनर्स आणि EMI संबधित RBI...

बँकांच्या सुट्टीच्या दिवशीही खात्यात जमा होणार पगार; पेंशनर्स आणि EMI संबधित RBI ची मोठी घोषणा

Subscribe

तुमच्या सोबत कधी असे झाले आहे का? पगाराच्या दिवशी बँकेची सुट्टी आली आणि तुमचा पगार उशीर झाला, किंवा असे झाले आहे का तुम्ही कर्जाचा हफ्ता देण्यासाठी ऑटोमेटिक पेमेंट हा पर्याय निवडला, परंतु बँकेच्या सुट्टीमुळे उशीर झाला.. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागले. या तुमच्या सगळ्या समस्यांना आरबीआय लवकरच दूर करणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी नॅशनल ऑटोमेटेड क्लीयरिंग हाऊसच्या (National Automated Clearing House (NACH)) सुविधेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. याचा फायदा मिळणं तुम्हाला ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

बँक हॉलिडेच्या दिवशी पगाराला सुट्टी

NACH ची सुविधा अद्याप बँक हॉलिडेच्या दिवशी उपलब्ध नसते. जर तुमचा पगार जमा करण्याचा दिवस हा शनिवार-रविवार किंवा कोणत्याही सणामुळे बँकेची सुट्टी असेल तर त्या दिवशी NACH कार्यन्वित न केल्यामुळे तुमच्या पगाराला उशीर होऊ शकतो. यामुळे, तुमच्या कर्जाची स्वयंचलित ईएमआय, पीपीएफ किंवा म्युच्युअल फंडाची बचत हप्ता या सर्वास उशीर होऊ शकतो. ज्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागते. पण आता आरबीआयने या समस्येवर तोडगा काढण्याचे ठरवले आहे.

- Advertisement -

संपूर्ण आठवडा मिळणार ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा

लोकांच्या अडचणी लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने वर्षभर आठवड्यातून सात दिवस NACH कार्यन्वित करण्याची घोषणा केली. ही सुविधा १ ऑगस्ट २०२१ पासून कार्यान्वित होईल. रिझर्व्ह बँकेच्या मते, RTGS ची सुविधा आठवड्याच्या सात दिवसांपासून सुरू केली गेली आहे. याचा फायदा घेत वर्षभर NACH कार्यान्वित करणार आहोत. ग्राहकांच्या हिताच्या सुविधा लक्षात घेऊन हे पाऊल उचलले गेले असल्याचेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ऑटोमेटिक पेमेंट सुविधेतील या बदलाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम ठेवण्याची आवश्यकता आहे.


लोकेश चंद्रा बेस्टचे नवे महाव्यवस्थापक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -