धक्कादायक! कोरोना व्हायरसने ३२ वेळा बदलले रुप

दक्षिण आफ्रिकेतील एड्सग्रस्त महिलेमध्ये आढळले कोरोनाचे बदलते रुप

Triple Mutation Strain Detected in 4 Indian States

दक्षिण आफ्रिकेत एका एचआयव्हीबाधित महिलेला गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या महिलेच्या शरीरात असलेल्या कोरोना विषाणूने ३२ वेळा आपली रचना बदलली आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याबाबतचा अहवाल मेडिकल जरनल मेडआरक्सिवमध्ये देण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील ३६ वर्षीय महिलेला २००६ साली एचआयव्हीची बाधा झाली होती. त्यानंतर तिची रोगप्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत गेली. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये तिला कोरोनाची लागण झाली. यावेळी तिच्या शरीरात कोरोना विषाणूंमध्ये बदल होत असल्याचे दिसून आले. विषाणूंमुळे स्पाइक प्रोटीनमध्ये १३ उत्प्रेरक जमा झाल्याचे निष्पन्न झाले.