घरक्राइमधक्कादायक: विरारमध्ये धारदार चाकू खुपसून पत्नीने केली पतीची हत्या

धक्कादायक: विरारमध्ये धारदार चाकू खुपसून पत्नीने केली पतीची हत्या

Subscribe

पती पत्नीत काही किरकोळ कारणावरुन वाद झाले. या भांडणातून बायकोने नवऱ्याची हत्या केली.

घरगुती भांडणे प्रत्येक घरात होत असतात. मात्र त्यातून काही धक्कादायक घटना सतत समोर येत आहेत. नालासोपारा येथे राहणाऱ्या एका पत्नीने आपल्या पतीची धारदार चाकूने निर्घूणपणे हत्या केली. एकीकडे महिला महिलादिन साजरा करत असताना. दुसरीकडे नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पत्नीत काही किरकोळ कारणावरुन वाद झाले. या भांडणातून बायकोने नवऱ्याची हत्या केली. या घटनेची विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपी बायकोलाही ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे दोघांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेहा पवार आणि लोकेश पवार हे दोघे दाम्पत्य नालासोपारा येथे राहत होते. त्यांना ८ वर्षांचा मुलगा देखिल आहे. नालासोपारा पूर्वच्या मकवाना कॉम्प्लेक्स येथील जीवदानी अपार्टमेंटमध्ये राहत होते. रविवारी पहाटे ३० वर्षीय लोकेश पवार कामावरुन घरी आला होता. लोकेश घरी येताच त्यांच्यात आणि नेहामध्ये किरकोळ गोष्टींवरुन वाद सुरु झाले. त्यांचा वाद इतका टोकाला गेले की, २९ वर्षीय नेहाने थेट घरातील धारदार चाकू लोकेशच्या पोटात खुपसून त्याची निर्घूण हत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी नेहाला तात्काळ अटक केली. मृत लोकेशचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांना नेहाची कसून चौकशी केली. घरगुती कारणावरुन झालेल्या वादामुळेच तिने नवऱ्याची हत्या केल्याचे कबूल केले.

- Advertisement -

आपल्या पतीची निर्घूणपणे हत्या करणाऱ्या नेहाला ८ मार्च रोजी वसई न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी पत्नी नेहाला न्यायालयाने ११ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पोलीस आणखी खोलात तपास करत आहेत.


हेही वाचा – गरोदर गर्लफ्रेंडला मारली मिठी अन् काही सेकंदात केलं खल्लास

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -