घरक्राइमविजय ताड हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासा; माजी भाजप नगरसेवकच खुनाचा मुख्य सुत्रधार

विजय ताड हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासा; माजी भाजप नगरसेवकच खुनाचा मुख्य सुत्रधार

Subscribe

भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत यानेच भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सांगलीतील जतचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्येचा उलगडा झाला आहे. सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे. यातील खुनाचा मुख्य सुत्रधार अजूनही फरार आहे. भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत यानेच भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संदीप चव्हाण, निकेश मदने, आकाश व्हनखंडे, किरण चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत याच्या सांगण्यावरुच ही हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याचे सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट

विजय ताड यांच्या हत्येप्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांवर गुन्हा नोंदवला. त्यानंतर गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली. परंतु, या हत्येमागचा मुख्य सुत्रधार भाजपचा माजी नगरसेवक फरार आहे. त्याचा शोध पोलीस पथकांकडून घेतला जात आहे. दरम्यान, ताड यांची हत्या सावंत याने का घडवून आणली? यामागचे मुख्य कारण मात्र अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती सांगलीचे पोलस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली.

- Advertisement -

( हेही वाचा: दुसऱ्यांसाठी खड्डे खणणारेच…, अनिल जयसिंघानीप्रकरणी भाजपाचा ठाकरेंवर निशाणा )

भरदिवसा गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून ताड यांची हत्या

सांगलीच्या जत याठिकाणी 17 मार्च रोजी भरदिवसा भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांनी गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालू हत्या करण्यात आली होती. विजय ताड हे दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले असता सांगोला रोडवरील अल्फोन्सो स्कूलजवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला.

- Advertisement -

या हत्येनंतर सांगली गुन्हे शाखेने वेगाने तपास सुरु केला. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती. तपासाअंती, पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आणि यातील चार आरोपींना अटक केली आहे. पोलीस सध्या या खुनाचा मुख्य सुत्रधार भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत याचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -