घरक्राइमCrime : शाळेतील भांडणाचे मारहाणीत रुपांतर; अल्पवयीन मुलाने गमावला जीव

Crime : शाळेतील भांडणाचे मारहाणीत रुपांतर; अल्पवयीन मुलाने गमावला जीव

Subscribe

नवी मुंबई : हुल्लडबाजी करणे, लहानसहान गोष्टींवरून मारामारी करणे आजच्या काळात सामान्य झाले आहे. परंतु अल्पवयीन मुलंही काही कारणाने भांडण करताना, मारामार करताना हमखास दिसतात. परंतु शाळेतील भांडण अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. सी. वि. सामंत शाळेच्या बाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime A school fight turned into a beating A minor lost his life)

हेही वाचा – Farhatullah Ghori : अक्षरधाम हल्ल्याचा मास्टरमाईंड फरहतुल्ला गोरीची भारताविरुद्ध युद्धाची घोषणा

- Advertisement -

डॉ. सी. वि. सामंत शाळेत बारावीसह इतर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला. शाळेत झालेल्या वाद शाळेबाहेर पुन्हा उफाळला. तुर्भे येथील मैदानात बुधवारी दुपारच्या सुमारास एका गटाच्या 10 ते 15 विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. यात गंभीर झालेल्या दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान आदित्य भोसले (17) नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर मृत व जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या मृत्यूने इतर पालकही धास्तावले आहेत. पोलिसांनी गंभीर घटनेची दखल घेत संशयित आरोपी विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र दोन्ही गटात वाद नेमका कशामुळं झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Ranji Trophy Final : मुंबईकडे 8 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी तर 42व्यांदा पटकावले जेतेपद 

दरम्यान, वाशीसह इतर परिसरातील काही शाळांबाहेर शाळकरी मुलांच्या गटागटातील भांडणाचे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. विद्यार्थ्यांच्या वादानंतर त्यांचे पालकही भांडण करताना दिसतात. मात्र तुर्भेतील घटनेवरून अल्पवयीन मुलांमध्ये शाळांबाहेर होणाऱ्या वादांचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. विद्यार्थ्यांच्या भांडणांचे शाळा प्रशासनांकडून गांभीर्य घेतले जात नसल्याने शाळकरी मुले गुन्हेगारीच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -