घरक्राइमCrime : इव्हेंट वेंडरसाठी दिलेल्या दोन कोटींचा अपहार करून फसवणूक; मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

Crime : इव्हेंट वेंडरसाठी दिलेल्या दोन कोटींचा अपहार करून फसवणूक; मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई : इव्हेंट वेंडरसाठी दिलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांचा अपहार करून एका खाजगी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोहन धनुका या सिनिअर अकाऊंट मॅनेजरविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. (Crime Fraud by embezzling two crores given to event vendors A case has been filed against the manager)

हेही वाचा – Uddhav Thackeray : भाजपाची हलाखीची परिस्थिती, त्यांना उमेदवारही…; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

- Advertisement -

तक्रारदार विपीन मदनलाल चौहाण हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील आझादनगर, विठ्ठल दर्शन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या मालकीची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असून या कंपनीचे मुख्य कार्यालय अंधेरीतील जे. पी रोड, अमेया हाऊसच्या पहिल्या मजल्यावर आहे. याच कंपनीत नोव्हेंबर 2021 रोजी रोहन धनुका हा सिनिअर मॅनेजर अकाऊंट म्हणून रुजू झाला होता. आपल्या कामातून त्याने विपीन चौहाण यांचा विश्‍वास संपादन केला, मात्र काही महिन्यानंतर त्याने त्याच्या पदाचा गैरवापर करून कंपनीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला होता.

हेही वाचा – Coastal Road : कोस्टल रोडची एक मार्गिका सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत; प्रवास कधी करता येणार?

- Advertisement -

2 एप्रिल 2022 ते 9 ऑक्टोंबर 2023 या कालाधीत त्याने कंपनीच्या बँक खात्यातून विविध इव्हेंट वेंडर यांना देण्याची एकूण रक्कमेपैकी 2 कोटी 15 लाख रुपयांची रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. अशा प्रकारे त्याने पैशांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केली होती. ऑडिटदरम्यान हा प्रकार उघडकीस येताच विपीन चौहाण यांनी या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा सुरू केली. त्यात रोहनने आपल्या पदाचा गैरवापर करून कंपनीच्या पैशांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर त्यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली. मदनलाल चौहाण यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रोहन धनुकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्ह्याची नोंद केली. सध्या या गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच रोहनची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -