Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक: वडिलांनी घेतला मुलीच्या बलात्काराचा बदला, केली सहा जणांची हत्या

धक्कादायक: वडिलांनी घेतला मुलीच्या बलात्काराचा बदला, केली सहा जणांची हत्या

बलात्काराचा बदला म्हणून आरोपी वडिलांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या घरातील ६ जणांची हत्या केली.

Related Story

- Advertisement -

आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी आंध्र प्रदेशच्या पेंडूरथी मंडल येथील एकाच घरातील ६ जणांची हत्या करुन आरोपी स्वत: पोलिसांच्या स्वाधिन झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या करणाऱ्या व्यक्तिचे त्या परिवाराशी गेल्या काही दिवसांपासून भांडण सुरु होते. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्या बलात्काराचा बदला म्हणून आरोपी वडिलांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या घरातील ६ जणांची हत्या केली.

द हिंदूने दिलेल्या माहितीनुसार, बी अप्पारालाजू असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने केलेल्या ६ जणांच्या हत्येमध्ये ६७ वर्षांची एक व्यक्ती, ३ महिला आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. या सहा जणांची हत्या केल्यानंतर आरोपी वडिलांनी स्वत: केलेल्या गुह्याची पोलिसांना कबुली दिली. हत्या करणारे वडिल आरोपी बी अप्पारालाजू सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. पोलिसांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार, त्या परिवारातील एका व्यक्तीने आरोपीच्या मुलीवर बलात्कार केला. बलात्कारी अद्याप फरार आहे. मात्र पिडित मुलीच्या वडिलांना त्याच्या परिवाराची माहिती मिळताच त्यांनी परिवारातील सहा जणांची हत्या केली. पोलिसांनाही चौकशीनंतर मोठा धक्का बसला आहे. एक माणूस ६ जणांचा खुन कसा काय करु शकतो. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ आणि भितीचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – संतापजनक! वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून बेरोजगार मुलाने केली हत्या

- Advertisement -