घर क्राइम कल्याणमध्ये थरारक घटना; आईसमोरच 12 वर्षांच्या मुलीची तरुणाकडून हत्या

कल्याणमध्ये थरारक घटना; आईसमोरच 12 वर्षांच्या मुलीची तरुणाकडून हत्या

Subscribe

कल्याणमधून एक थरारक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आईसमोर एका 20 वर्षीय तरुणाने जीवघेणा हल्ला केला आहे. कल्याणमधील तिसगाव परिसरात ही घटना घडली.

कल्याणमधून एक थरारक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आईसमोर एका 20 वर्षीय तरुणाने जीवघेणा हल्ला केला आहे. कल्याणमधील तिसगाव परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर सध्या परिसरात भीतीचं वातावरण आहे. या तरुणानं अल्पवयीन मुलीवर चाकुने सात ते आठ वार केले. या हल्ल्यात या मुलीचा मृत्यू झाला.

मृत मुलगी ही फक्त 12 वर्षांची आहे. आदित्य कांबळे ( वय 20) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी हा चेतना नगर परिसरात राहणारा आहे. भररस्त्यात आरोपीने मुलीची हत्या केली आहे. ( Kalyan Crime A minor girl killed by a 20 year old man in front of her own mother in Tisagaon area of Kalyan )

नेमकं काय घडलं?

- Advertisement -

कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत मुलगी दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारातच हा प्रकार घडला. आई समोरच आरोपीने या 11 वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला अटक

आरोपी आकाश कांबळे या मुलीवर हल्ला करत असताना स्थानिकांनी पाहिलं. स्थानिकांनी त्याला अडवलं. मात्र, तोपर्यंत त्याने या मुलीवर सात ते आठ वार केले होते. स्थानिकांनी या आरोपीला पकडून त्याच्या हातातील चाकू हिसकावला आणि त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीने या 11 वर्षीय मुलीची हत्या का केली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

- Advertisement -

( हेही वाचा: पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; चांदवडला टोल कर्मचारी अटकेत, वातावरण तणावपूर्ण )

दिल्लीतल्या साक्षीवरही 40 वार

राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरल्याचं पाहायला मिळालं होतं. 28 मे रोजी साक्षी नावाच्या एका अल्पवयीन मुलीची अत्यंत क्रूरपणे चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. दिल्लीत एका 16 वर्षीय मुलीची तिच्या प्रियकराकडून तब्बल 40 वार करून हत्या करण्यात आली होती. रविवारी (ता. 28 मे) रात्री शाहबाद डेअरी परिसरात या घटनेने खळबळ उडाली. मनाचा थरकाप उडवणारी ही घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये सुद्धा कैद झाली.  पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच आरोपी तरूणाला बुलंदशहर येथून अटक केली होती.

- Advertisment -