Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र महानगर IMPACT : गंगापूर येथील दुय्यम निबंधक प्रवीण राठोड अखेर निलंबित

महानगर IMPACT : गंगापूर येथील दुय्यम निबंधक प्रवीण राठोड अखेर निलंबित

Subscribe

छत्रपती संभाजी नगर : शासन निर्णयानुसार तुकडेबंदी आदेशाचा व महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 च्या नियम 44(1) नुसार आदेशाचे पालन न करता सर्रासपणे बेकायदेशीर दस्तांच्या नोंदणी गंगापूर येथील दुय्यम निबंधक प्रवीण राठोड करत असल्याची बातमी दै. आपलं महानगर’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्याची दखल पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक गोविंद कराड यांनी घेत अखेर दुय्यम निबंधक प्रवीण राठोड याच्यावर ठपका ठेवून निलंबित करण्याचे आदेश दिले.

या आदेशात नमूद केले आहे की, गंगापूर येथील दुय्यम निबंधक प्रवीण राठोड याने शासकीय कर्तव्य पार पाडताना कर्तव्यात कसूर करत लोकसेवक म्हणून स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून शासकीय कर्मचार्‍यास अशोभनीय असे गैरवर्तन केल्याने नोंदणी व मुद्रांक विभागाची जनमानसातील प्रतिमा मलीन झालेली असून अनियमिततेच्या अनुषंगाने शिस्तभंगविषयक कार्यवाही करणे क्रमप्राप्त आहे.

- Advertisement -

\राठोड याने केलेले कृत्य हे गंभीर स्वरुपाचे असल्याने त्याला शासन सेवेत कार्यरत ठेवणे कार्यालयीन शिस्तीवर प्रतिकूल परिणाम करणारे व शासन हितास उचित होणार नाही, असे निम्नस्वाक्षरीकार यांचे मत झाले आहे. त्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार राठोड, दुय्यम निबंधक श्रेणी १, गंगापूर यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 चे नियम 4 अन्वये निलंबित करण्याचे आदेश पारित करून निलंबनाच्या कालावधीत दुय्यम निबंधक राठोड याचे मुख्यालय सहजिल्हा निबंधक वर्ग-1 गोंदिया हे राहील. राठोड याने सह जिल्हा निबंधक वर्ग-1 गोंदिया यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, त्याचप्रमाणे त्याला निलंबन कालावधीच्या काळात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणतीही नोकरी स्विकारता येणार नाही. जर त्याने निलंबनाच्या कालावधीत अशी कोणतीही नोकरी स्विकारली किंवा धंदा वा उद्योग केल्यास गैरवर्तनाबद्दल दोषी धरण्यात येईल व त्याबाबत त्याचेविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश पुणे नोंदणी महानिरीक्षक गोविंद कराड यांनी दिले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -