घरक्राइमसंगीतकाराला गुंगीचे औषध देऊन लुटले; अभिनेत्रीसह दोघांना अटक

संगीतकाराला गुंगीचे औषध देऊन लुटले; अभिनेत्रीसह दोघांना अटक

Subscribe

तक्रारदार चेन्नईचे रहिवाशी असून ते संगीतकार आहेत. दीड वर्षांपूर्वी त्यांची फेसबुकवरुन (facebook) अमृतासोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले. त्यानंतर त्यांच्यात चॅटींग सुरु झाले. यावेळी तिने आपण अ‍ॅक्टर असल्याचे असून तिच्यासाठी काम पाहण्यास सांगितले होते.

चेन्नईच्या एका संगीतकाराला (Chennai musician) दारुतून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील आयफोन, सोन्याचे दागिने, हिर्‍याचा क्रॉस लॉकेट घेऊन पळून गेललेया तिघांना आंबोली पोलिसांनी (Amboli police) अटक ( arrested) केली. आरोपींमध्ये अभिनेत्री अमृता भुपेंद्रपालसिंग धनोआ, मॉडेल रिना ऊर्फ डोना सुजीतकुमार सिंग आणि इंजिनिअर विनीत याचा समावेश आहे. आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

फेसबुकवरुन ओळख

- Advertisement -

तक्रारदार चेन्नईचे रहिवाशी असून ते संगीतकार आहेत. दीड वर्षांपूर्वी त्यांची फेसबुकवरुन (facebook) अमृतासोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले. त्यानंतर त्यांच्यात चॅटींग सुरु झाले. यावेळी तिने आपण अ‍ॅक्टर असल्याचे असून तिच्यासाठी काम पाहण्यास सांगितले होते. एक वर्षांपूर्वी त्यांची वर्सोवा (varsova) येथील सोशल क्लबमध्ये भेट झाली होती. ते २४ मे रोजी काही कामानिमित्त चेन्नई येथून मुंबईत आले होते. यावेळी तिने त्यांना फोन करुन त्यांचा 31 मे ला वाढदिवस असल्याने तिला त्यांना पार्टी द्यायची आहे असे सांगून भेटण्यास बोलाविले. 28 मे ला ती त्यांना घेण्यासाठी अंधेरीतील यशराज स्टुडिओजवळ आली होती. यावेळी तिच्यासोबत तिच्या कारमध्ये एक महिला आणि एक चालक होता.

रस्त्यावर टाकून पलायन

- Advertisement -

या दोघांनी कारमध्ये मद्यप्राशन सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना दारुची ऑफर दिली होती. अंधेरी येथून ते सर्वजण वांद्रे, कुलाबा, चर्चगेट येथे गेले. रात्री उशिरा तिने त्यांच्या दारुमध्ये गुंगीचे औषध दिले होते. त्यामुळे ते कारमध्येच बेशुद्ध झाले. जुहू येथे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील आयफोन, सोन्याची चैन, ब्रेसलेट आणि हिर्‍याचा क्रॉस असलेला लॉकेट काढून त्यांना रस्त्यावरच टाकून तेथून पलायन केले होते. दुसर्‍या दिवशी त्यांना जाग आल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला पडल्याचे दिसून आले. त्यांचा मोबाईल, सोन्याचे दागिने चोरीस गेले होते.

वर्सोवा, यारी रोड परिसरात वास्तव्य

अमृतासह इतर दोघांनीच ही चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी आंबोली पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केूला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपत बनसोडे यांच्या पथकातील एपीआय निलेश पाटील, राम ठाणगे, मस्कर, व अन्य पोलीस पथकाने अंधेरीतील वर्सोवा आणि यारी रोड परिसरात राहणार्‍या अमृता, डोना आणि विनित या तिघांना पोलिसांनी अटक केली.

अमृताला आधीही अटक

तपासात अमृता ही अभिनेत्री, डोना ही मॉडेल तर विनीत हा इंजिनिअर असल्याचे उघडकीस आले. विनीतची डोना ही गर्लफेंण्ड आहे. गुन्ह्यांतील कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती कार त्याच्याच मालकीची आहे. अमृताला यावर्षीच दिडोंशी पोलिसांनी पिटाच्या एका गुन्ह्यांत अटक केली होती. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास सुरु आहे. या तिघांकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल जप्त केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -