घरक्राइमSharad Mohol Case : मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक; पुणे पोलिसांच्या...

Sharad Mohol Case : मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

Subscribe

पुण्यात 5 जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोप गणेश मारणेला पुणे पोलिसांनी अटक केले आहे. या प्रकरणातील आरोपींला पोलिसांनी सिनेस्टाईने पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नाशिक रोड येथून अटक केले आहे. गणेश मारणे हा शरद मोहेळ हत्याचे मुख्य सुत्रधार आहे. गणेश मारणेसह 16 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे.

पुण्यात 5 जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर राज्यात खळबळ उडाली होती. या हत्येनंतर पोलिसांनी काही तासांत सात जणांना अटक केली. यानंतर पोलिसांनी 15 जानेवारी रोजी पनवेल आणि वाशी येथून 10 जणांना अटक केले होते. यात रामदास उर्फ वाघ्या मारणे, विठ्ठ शेलार यांच्यासह 10 जणांना पोलिसांनी अटक केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – LPG Cylinder Price : बजेटच्या दिवशीच महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किंमती वाढल्या

पोलिसांची दिशाभूल करत मारणेंचा पळ

गेल्या काही दिवसांपासून गणेश मारणेंना पोलिसांनी अटक केले आहे. पोलिसांना गणेश मारणे हे तुळजापूर येथे गेल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस सुद्धा तुळजापूरमध्ये दाखल झाले, पण गणेश मारणेंनी कर्नाटकात गेल्याची माहिती मिळाली. मग पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेचे दुसरे पथक कर्नाटकमध्ये पाठविले. तेव्हा गणेश मारणेंना पोलिसांना फसवून पुन्हा कर्नाटकातून पळून केरळमध्ये गेला, तेथेही फार काळ राहिला नाही. यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी गणेश मारणे ओडिशात गेला, येथून नाशिकमध्ये आला. गणेश मारणे हा नाशिकमध्ये आल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. मग पुणे पोलिसांनी सापळा रचला.

- Advertisement -

हेही वाचा – Union Budget 2024 : अंतरीम अर्थसंकल्पात ‘या’ घोषणा होण्याची शक्यता ? वाचा सविस्तर

पुणे पोलिसांनी असे अटक केले गणेश मारणेला

आरोपी गणेश मारणे नाशिकमध्ये असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गणेश मारणेंचा शोध घेतला. यानंतर रस्त्यात तीन ट्रॅव्हल्स बसची तपासणी करत असताना, अखेर गणेश मारणेसह त्यांच्या साथीदारांना मोटरीतून जात असताना पोलिसांनी सिनेस्टाईने पाठलाग करत त्याला अटक केले

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -