घरदेश-विदेशदहा कापलेले हात सापडल्याने ओडिशात खळबळ

दहा कापलेले हात सापडल्याने ओडिशात खळबळ

Subscribe

ओडिशातील कलिंगनगर विभागात दहा कापलेले हात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. २००६ मध्ये झालेल्या गोळीबारीत मृत्यू झालेल्यांचे हे हात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ओडिशाच्या जाजपुर परिसरात कापलेले १० हाथ सापड्याले एकच खळबळ उडाली. हे हाथ कलिंगनगर विभागात सापडले आहेत. २००६ मध्ये झालेल्या पोलीस फायरिंगमध्ये मृत पावलेल्या लोकांचे हात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर्षी जानेवारी महिन्यात एका स्टील प्लांटचा विरोध या लोकांना केला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होती. गर्दीवर नियंत्रण नसल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. ज्यामध्ये १३ लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान घटनेनंतर पोलिसांना यांची ओळख पटली नव्हती. यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या हाताचे ठसे मिळावेत यासाठी त्यांचे हात कापले होते. दोनवर्षांपूर्वी हे कापलेले हात त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले होते. मात्र नातेवाईकांनी हात घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर या हातांना मेडिकल लॅबमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र काही वेळानंतर याकडे कोणीच लक्ष दिले नाही.

“शनिवारी रात्री काही इसमांना लॅबची खिडकी तोडून आत प्रवेश केला होता. लॅबमध्ये असलेला बाँक्स घेऊन ते पसार झालेत. मात्र कलिंग नगर विभागात जाऊन हा बॉक्स उघडला असता तर त्यांना कापलेले हाथ आढळले. हा बॉक्स याच ठिकाणी टाकून या इसमांनी पळ काढला. यानंतर येथील स्थानिकांना हा बॉक्स आढळला. बॉक्समध्ये हात आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण होते. त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हा बॉक्स ताब्यात घेतला.”- पोलीस अधिक्षक सी एस मीना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -