भाजप खासदार वरुण गांधी-संजय राऊतांमध्ये डिनर डिप्लोमसी, ३ तासांच्या चर्चेवरुन राजकीय वर्तुळात खळबळ

माझी आणि वरुण गांधी यांची भेट सदिच्छा भेट होती. त्यांच्या परिवाराचे आणि ठाकरे परिवाराचे चांगले संबंध आहेत. यापुढेसुद्धा आम्ही भेटत राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

3 hours Dinner diplomacy between BJP MP Varun Gandhi and Sanjay Raut at delhi
भाजप खासदार वरुण गांधी-संजय राऊतांमध्ये डिनर डिप्लोमसी, ३ तासांच्या चर्चेवरुन राजकीय वर्तुळात खळबळ

भाजप खासदार वरुण गांधी भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत आणि वरुण गांधी यांच्यात डिनर डिप्लोमसी झाली आहे. दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी वरुण गांधी सजंय राऊतांच्या घरी आले होते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल ३ तास चर्चा सुरु होती. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. वरुण गांधी शिवसेनेत प्रवेश करणार का? अशी चर्चा देखील सुरु झाली आहे. भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली आहे. २०१९ मध्ये युती तुटल्याने भाजप सत्तेपासून दूर झाली आहे. यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर भाजप खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांनी खासदार वरुण गांधींना डिनरसाठी आमंत्रित केले होते. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. परंतु दोन बडे नेते एकत्र आले की, राजकीय चर्चा होते असे संजय राऊतांनी म्हटलंय त्यामुळे या भेटीमध्येही राजकीय चर्चा झाली असणार हे नककी आहे.

वरुण गांधी भाजपमध्ये नाराज नेते

खासदार वरुण गांधी हे भाजपवर नाराज आहेत. भाजपमध्ये सक्रिय भूमिका घेणारे वरुण गांधी गेल्या काही वेळापासून अलिप्त राहिल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधून वरुण गांधी खासदार राहिले आहेत. लखीमपूर खेरी प्रकरणात वरुण गांधी यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन भाजपचे नाव काढलं आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन वरुण गांधी यांनी भाजपविरोधात भूमिका घेतली असल्याने अडचणी वाढल्या आहेत. पक्षातील नेत्यांविरोधातही ते टीका करत असतात त्यामुळे भाजपची साथ लवकरच वरुण गांधी सोडतील अशी चर्चा सुरु आहे.

वरुण गांधींशी सदिच्छा भेट

बरेच दिवस भेटी संदर्भात वेळ पुढे मागे होत होती. मंगळवारी आमची भेट झाली. जरी ते खासदार असतील, राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि गांधी कुटुंबाशी संबंधित असतील तरी ती भेट सदिच्छा भेट होती. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. वरुण गांधी उत्तम लेखक आहेत. अनेक विषयांवर ते चांगल्या गप्पा मारतात राजकीय विषयावर चर्चा करत असतात. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगली भूमिका घेतली होती. परंतु माझी आणि वरुण गांधी यांची भेट सदिच्छा भेट होती. त्यांच्या परिवाराचे आणि ठाकरे परिवाराचे चांगले संबंध आहेत. यापुढेसुद्धा आम्ही भेटत राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार रिफायनरीसाठी बारसूचा प्रस्ताव, राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया