घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१ लाखांहून अधिक!

CoronaVirus: जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१ लाखांहून अधिक!

Subscribe

जगभरातील कोरोनाग्रस्तांची आकडा झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जगभरातील २ लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१ लाखांवर पोहोचला असून यापैकी २ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दिलास देणारी बाब म्हणजे आतापर्यंत १४ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून स्पेन, इटली, ब्रिटन, रशिया हे देश पहिल्या पाचमध्ये आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ४१ लाख ३ हजार ५३९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ लाख ८० हजार ४७० जण मृत्युमुखी पडले आहे. तसंच १४ लाख ४३ हजार ४८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाग्रस्त रुग्ण आणि एक चतुर्थांश कोरोनाचे मृत्यू अमेरिकेत झाले आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे १३ लाख ४७ हजार ३१८ रुग्ण आढळले असून त्यापैकी ८० हजार ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३८ हजार ८० कोरोनाचे रुग्ण हे बरे झाले आहेत.

- Advertisement -

या पाच देशांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

अमेरिका – कोरोनाग्रस्त- १,३४७,३१८ मृत्यू- ८०,०४०
स्पेन – कोरोनाग्रस्त- २६२,७८३ मृत्यू- २६,४७८
इटली – कोरोनाग्रस्त- २१८,२६८ मृत्यू- ३०,३९५
यूके – कोरोनाग्रस्त- २१५,२६० मृत्यू- ३१,५८७
रशिया – कोरोनाग्रस्त – १,९८,६७६ मृत्यू- १,८२७


हेही वाचा – Breaking: कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -