घरदेश-विदेशCorona: रस्त्यावर पडले होते ५ हजार रुपये, पण कोरोनामुळे कुणी उचलायला येईना!

Corona: रस्त्यावर पडले होते ५ हजार रुपये, पण कोरोनामुळे कुणी उचलायला येईना!

Subscribe

गुरुग्राम जिल्ह्याच्या पटौदीतील गाव बलेवा येथे रस्त्यावर पडलेल्या पैशांमुळे गावात खळबळ

गेल्या काही दिवसांपुर्वी लॉकडाऊनदरम्यान दिल्लीच्या द्वारका सेक्टर ४ मध्ये पोलिसांना रस्त्यावर ५०० आणि २००० रूपयांच्या नोटा पडलेल्या दिसल्या होत्या त्यानंतर असाच काहीसा प्रकार गुरुग्राम जिल्ह्याच्या पटौदीतील गाव बलेवा येथे बघायला मिळाला. जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत असताना दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना व्हायरस सारख्या महामारीला काही नागरिक गांभिर्याने घेताना दिसताय तर काही ठिकाणी नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडवल्याचे अनेक प्रकार देखील समोर आले आहेत.

हरयाणातील गुरुग्राममध्ये कोरोनाची दहशत

सुरुवातीच्या काळात सोशल मीडियावरील थट्टेचा विषय बनलेला कोरोना आता प्रत्येकजण गांभिर्याने घेत आहे. मात्र, अशा परिस्थितीत काही गैरसमज आणि अफवाही मोठ्या प्रमाणात पसरल्या जात आहेत. लॉकडाऊनदरम्यान हरयाणातील गुरुग्राम येथे चक्क रस्त्यावर पडलेल्या नोटा घेण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. प्रत्येकाच्या मनात अजूनही कोरोनाची दहशत दिसतेय.

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये दिल्लीच्या रस्त्यांवर चक्क दिसताय ५०० आणि २००० रूपयांच्या नोटा!

असा घडला प्रकार

गुरुग्राम जिल्ह्याच्या पटौदीतील गाव बलेवा येथे रस्त्यावर पडलेल्या पैशांमुळे गावात खळबळ माजली. बलेवा गावातील रस्त्यावार चक्क ५००० रुपये पडल्याचे समोर आले, यामध्ये १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या नोटांचा समावेश होता. मात्र, या नोटांना खिशात घालायला कोणीही पुढे सरसावले नाही किंवा कोणाची हिंमतही झाली नाही. देशात असलेल्या कोरोनाच्या दहशतीमुळेच नागरिकांनी या रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही नोटांना हात लावला नाही. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन या नोटा ताब्यात घेतल्या.

दरम्यान, पटौदी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने येथील तीन परिसरांना कंटनेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. घडलेल्या प्रकाराचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -