घरCORONA UPDATECoronaVirus: अखेर 'त्या' ६ महिन्याच्या बाळाची मृत्युशी झुंज अपयशी ठरली

CoronaVirus: अखेर ‘त्या’ ६ महिन्याच्या बाळाची मृत्युशी झुंज अपयशी ठरली

Subscribe

चंदिगडमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या अवघ्या ६ महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

चंदिगडमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या अवघ्या ६ महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चंदिगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्सिट्युट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या हॉस्पिटलमध्ये फगवारा येथील बाळावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी या बाळाचा चाचणी अहवाल आला असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यानंतर या बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच बाळाला हृदयाचा त्रास होत असल्याचेही सांगितले गेले. या हॉस्पिटलमधील प्रवक्त्यांनी माहिती देताना सांगितले की, गुरूवारी दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी या बाळाचा मृत्यू झाला. प्रथम या बाळावर फगवारा येथे उपचार करण्यात आले. नंतर तिला लुधियाणामधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तिला या इन्सिट्युटच्या हॉस्पिटलमध्ये आणले गेले.

- Advertisement -

देशात अनेक ठिकाणी लहान बाळांना कोरोनाची लागण झाल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनही त्यादृष्टीने विशेष काळजी घेत आहे. दरम्यान, देशात आता गेल्या २४ तासांत देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत १ हजार ४०९ रुग्णांची वाढ झाली असून ३८८ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठवले असल्याची माहिती आज आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आली आहे. शिवाय आतापर्यंत १९ टक्के कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून सध्या देशात २१ हजार ३९३ जण कोरोनाबाधित आहेत. तर ६८१ लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा –

वटवाघळात शेकडो कोरोना विषाणू; भविष्यात पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा प्रसार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -