घरदेश-विदेशवयाच्या ६५ व्या वर्षी 'ती' झाली आई

वयाच्या ६५ व्या वर्षी ‘ती’ झाली आई

Subscribe

काश्मीर येथील एक ६५ वर्षीय महिलेने एका सुदृध मुलीला जन्म दिला आहे. यानंतर बाळाच्या ८० वर्षीय वडिलांनी देवाचे आभार मानले आहे.

अभिनेता आयुषमान खुरानाचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बधाई हो’ चित्रपटाने बाॅक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. हा चित्रपट खूपच साध्या पण थेट पद्धतीने एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. याचित्रपटामध्ये आईची भुमिका करणारी नीना गुप्ता बाळंतीन असल्याची घटना दाखली होती. मात्र हा प्रकार खऱ्या जीवनात घडला तर काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडल्या शिवाय राहिला नाही. मात्र अशीच एक घटना काश्मीर येथे घडली आहे. एका महिलेने वयाच्या ६५ वर्षी एका मुलीला जन्म दिला आहे. जन्म दिल्यानंतर या मुलीच्या ८० वर्षाच्या वडिलांनी देवाचे आभार मानले आहे. हे मुल म्हणजे देवाने दिलेली अनमोल भेट असल्याचे सांगितले आहे. डेली मेल या वृत्त संस्थेद्वारे दिलेल्या माहितीनुसार या दाम्पत्याला १० वर्षाचा मुलगा ही आहे.

परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा

ही महिला काश्मीरच्या पुंच जिल्ह्यात राहाते. प्रसुती कळा सुरु झाल्यामुळे तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेची सुखरूप प्रसुती करण्यात आली होती. या महिलेने सुदृढ मुलीला जन्म दिला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भारतात ४७ वयोमर्यादे पर्यंतच महिलांना मुले होतात. असे डॉक्टरांचे मत आहे. मात्र हा प्रकार फार कमी प्रमाणात होतात.

- Advertisement -

७२ वर्षीय महिला बनली आई

या अगोदर एका ७२ वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना पंजाब येथे घडली होती. दलजिंदर कौर असे या महिलेचे नाव आहे. नैसर्गिक पद्धतीने या महिलेची प्रसुती करण्यात आली होती. त्यांचे पती मोहिंदर सिंग हे ७९ वर्षाच्या वयाचे आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -