घरदेश-विदेशकोरोना रूग्णाच्या मृत्यूनंतर दिल्लीत ६८ डॉक्टरांसह परिचारिकांना केले क्वारंटाईन!

कोरोना रूग्णाच्या मृत्यूनंतर दिल्लीत ६८ डॉक्टरांसह परिचारिकांना केले क्वारंटाईन!

Subscribe

महिलेच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या ६८ डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफला होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहे

दिल्लीच्या शासकीय भगवान महावीर रुग्णालयात ६८ डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान एका २५ वर्षीय गर्भवती महिलेला या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी ही महिला परदेशातून आली असून तिला होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या महिलेने रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर ही माहिती रूग्णालयाला सांगितली नाही. त्यामुळे तिला या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

असा घडला प्रकार

१३ एप्रिल रोजी या महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. १५ एप्रिल रोजी महिलेची प्रकृती अधिक खालावली त्यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर गर्भवती महिला रूग्णाने असे सांगितले की, ‘मी परदेशातून भारतात परतली असून मी कोरोनाची लागण झालेल्या सह-प्रवाशांच्या संपर्कात आली होती.’ तसेच या महिलेच्या कुटुंबातील चार सदस्यांना १० एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती या महिलेने दिली.

- Advertisement -

महिलेची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने १५ एप्रिलच्या रात्री तिचा कोरोनाने मृत्यू झाला. त्या महिलेच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या ६८ डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफला होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता की नाही याची रिपोर्ट अद्याप मिळालेली नाही.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरसची लागण होण्याची संख्या १२ हजार ७५९ पर्यंत वाढली असून गेल्या २४ तासात कोरोनाचे ८२६ नवीन रुग्ण आढळले आहे तर २८ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५१५ रुग्णांनाही या आजारावर मात करून ते यशस्वी झाले आहे.

- Advertisement -

CoronaVirus: हिवाळ्यात पुन्हा कोरोना व्हायरसचं संकट येणार!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -