घरदेश-विदेशसरकारी नोकरी शोधताय? तर ही बातमी नक्की वाचा!

सरकारी नोकरी शोधताय? तर ही बातमी नक्की वाचा!

Subscribe

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील ६ लाख ८३ हजार पदे रिक्त आहेत. बुधवारी लोकसभेत या विषयी माहिती देण्यात आली. केंद्र सरकारमध्ये एकूण ३८ लाख २ हजार ७७९ पदे आहेत त्यापैकी ३१ लाख १८ हजार ९५६ पदांवर अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत.

१ मार्च २०१८ला ६ लाख ८३ हजार ८२३ पदे रिकामी होती. निवृत्त, राजीनामा,मृत्यू, पदोन्नती यांमुळे ही पदे रिक्त झाली आहेत, ती भरण्याची प्रक्रिया संबंधित खात्यांतर्फे ठरवून दिलेल्या नियमांनुसार सुरू असते. अशी माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.

- Advertisement -

२०१९-२० या आर्थिक वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन बोर्ड व रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड यांनी १ लाख ३४ हजार पदे भरण्याची शिफारस आम्हाला केली आहे. त्यापैकी सर्वाधिक १ लाख १६ हजार ३९१ पदे भरण्यात यावीत, असे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने सांगितले आहे. स्टाफ सिलेक्शन बोर्डाने १३ हजार ९९५ तर केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४,३९९ पदे भरण्याची शिफारस केली आहे. रेल्वे बोर्ड व स्टाफ सिलेक्शन बोर्ड यांच्याखेरीज पोस्टल सर्व्हिस बोर्ड आणि संरक्षण मंत्रालय यांनी ३ लाख १० हजार ८३२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात नागरी संरक्षण दलातील २७ हजार ६५२ जागाही भरण्यात येत आहेत.

सर्व खात्यांनी व मंत्रालयांना रिक्त पदे भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी लवकरच ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहेत. तसेच ताप्तुरती पदे आहेत, ती ताबडतोब भरावीत अशा सूचना दिल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -