घरदेश-विदेशउत्तर काशीतील हिमस्खलनात 10 जणांचा मृत्यू ,18 जण अजून बेपत्ता; बचाव...

उत्तर काशीतील हिमस्खलनात 10 जणांचा मृत्यू ,18 जण अजून बेपत्ता; बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण

Subscribe

उत्तराखंडमध्ये हवामानात झपाट्याने बदल होत आहे. याठिकाणच्या डोंगराळ भागात मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी सुरु आहे. दरम्यान बर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमस्खनामुळे उत्तर काशीतील नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगचे (NIM) 29 प्रशिक्षणार्थी द्रौपदी दांडा येथे अडकले होते. दरम्यान यातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण अजून बेपत्ता असून त्यांचे बचावकार्य सुरु आहे.

या दुर्घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बातचीत करत बचाव कार्यासाठी लष्कराची मदत मागितली आहे. ज्यानंतर लष्कराचे बचावकार्य सुरु झाले आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या निधनावर स्वत: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. राजनाथ सिंह यांनी ट्विट करत म्हटले की, उत्तरकाशी येथील नेहरू पर्वतारोहण संस्थेने केलेल्या गिर्यारोहन मोहिमेत हिमस्खलनामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे खूप दु:ख झालो आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत.

- Advertisement -

त्यांच्या पुढील ट्विटमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बातचीच करत परिस्थिती जाणून घेतली, अडकलेल्या गिर्यारोहकांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरु आहे. मी हवाई दलाला बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.

- Advertisement -

या घटनेवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करत लिहिले की, द्रौपदीच्या दांडा २ पर्वत शिखरावर हिमस्खलनात अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी आणि आयटीबीपी आणि एनआयएमच्या चमूने प्रयत्न केले आहेत. सध्या बचाव कार्य सुरु आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करत सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलून त्यांना बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराची मदत घेण्याची विनंती केली, यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. दरम्यान सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव मोहिम राबवली जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -