घरट्रेंडिंगकोरोनाच्या निर्बधांवर तोडगा ! एकाचवेळी ९० जोडप्यांनी उरकले लग्न

कोरोनाच्या निर्बधांवर तोडगा ! एकाचवेळी ९० जोडप्यांनी उरकले लग्न

Subscribe

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे साहजिकच लग्नकार्यांमध्येही अडथळे आले. अनेकांची ठरलेली लग्न दोन तर काहींची तीनवेळी रद्द करण्यात आली. सतत घातलेला लग्नाचा घाट यामुळे आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागले. मात्र काही कालावधीनंतर कोविडचा प्रादुर्भाव कमी होताच अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी लग्नकार्ये उरकून घेतली. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन डोके वर काढत असून, अनेक गोष्टींवर पुन्हा बंधन लादण्यात आली आहेत. त्यातच आता लग्नसराईचा काळ असल्यामुळे अनेकांची लग्न ठरली असून, या लग्नकार्यांवर पुन्हा एकदा टांगती तलवार आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र, या कोविडपासून वाचण्यासाठी तामिळनाडूमध्ये तोडगा काढण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे तामीळनाडूतील मंदिर बंद असल्यामुळे तब्बल ९० जोडपी एकाच दिवशी एकाचवेळी लग्नबंधनात अडकली आहेत.

तामिळनाडूत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 नियम लागू करण्यात आले आहेत. त्यातच धार्मिक स्थळे शुक्रवार,शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यावर तोडगा म्हणून, शीर्ष वैष्णव मंदिराच्या बाहेर 90 जोडप्यांचे लग्न लावण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे हे मंदिर लग्नकार्यांसाठी तामिळनाडूमधील प्रसिद्ध मंदिर आहे. रविवारी पहाटे 4:30 ते 11 वाजताच्या दरंम्यान, हा 90 जोडप्यांचा भव्य विवाहसोहळा संपन्न झाला आहे. या मंदिर परिसरात एकाचवेळी तब्बल 40 जोडपी लग्न करतील इतकी प्रशस्त जागा आहे. त्यामुळे कोविडच्या टांगत्या तलवारीवर शक्कल लढवत हा भव्य विवाहसोहळा पार पडला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Matrimonial Sites : लग्नसंस्थेवरील वधू- वराचा प्रोफाईल खरा की खोटा कसे ओळखाल?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -