घरदेश-विदेशकौमार्य चाचणी विरोधात कारवाई करा - एमएएनएस

कौमार्य चाचणी विरोधात कारवाई करा – एमएएनएस

Subscribe

वधू-वराला कौमार्य चाचणी करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकाराविरोधात कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

लग्नात कौमार्य चाचणी करण्याची घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (एमएएनएस) याचा विरोध केला आहे. अशी चाचणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी एमएएनएसद्वारे केली जात आहे. पुण्यामध्ये उच्चशिक्षित वधू-वरांना जातपंचायतीला शरण जावे लागल्याची घटना घडली आहे. कंजारभट समाजामध्ये आजही जातपंचायत भरवली जात आहे. जातपंचायतीसमोर या सुशिक्षित वधू-वराला कौमार्य चाचणी करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

असा झाला प्रकार उघड 

पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक यांचा मुलगा ज्याचे इंग्लंजमध्ये शिक्षण झाले आहे. त्याचे लग्न माजी पोलीस अधिकाऱ्याच्या उच्चशिक्षित मुलीसोबत झाले. दोघेही सुशिक्षित कुटुंबातील असताना देखील त्यांनी कौमार्य चाचणीला संमती दिली आहे. कंजारभट समाजातील या प्रथेला विरोध करणारे आणि राज्य सरकारमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कृष्णा इंद्रेकर यांनी ही घटना उजेडाट आणली आहे. कौमार्यचाचणीला विरोध केला जात असताना देखील आजही महाराष्ट्रामध्ये जातपंचायत घेऊन कौमार्य चाचणी केली जात असल्याचे या प्रकरणामुळे समोर आल होता.

- Advertisement -

अशी केली जाते कौमार्य चाचणी 

पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये माजी नगरसेवकाचा मुलगा आणि माजी पोलीस निरिक्षकाच्या मुलाचा विवाहसोहळा संपन्न झाला. कंजारभाट समाजामध्ये विवाहच्या आधी आणि नंतर जातपंचायत भरवली जाते. विवाह झाल्यानंतर वधूची कौमार्यचाचणी केली जाते. त्यासाठी वधू आणि वराला एका अज्ञात ठिकाणी घेऊन जाते त्यांना मधुचंद्राच्या नावाखाली एका खोलीत घेऊन गेले जाते. त्याठिकाणच्या खोलीबाहेर जातपंचायत भरवली जाते. त्यामधील एक सदस्य वराला वधू शुध्द आहे की नाही अशी विचारणा करतो. त्यानंतर मधुचंद्रासाठी खाटेवर टाकण्यात आलेल्या पांढऱ्या शुभ्र कापडावरील रक्ताचे डाग दावखले जाते. त्यानंतर जातपंचायत वधू शुध्द असल्याचे सांगतात. जर वधू शुध्द नसेल तर तिच्या कुटुंबियांकडून दंड आकारला जातो त्यानंतर विवाहाला मान्यता दिली जाते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -