घरदेश-विदेशमरणानंतरही जातीने तिची पाठ सोडली नाही!!

मरणानंतरही जातीने तिची पाठ सोडली नाही!!

Subscribe

जात पंचायतीचा जाच आजही कायम आहे. दुसऱ्या जातीतील महिलेशी लग्न केले म्हणून गावकऱ्यांनी त्याच्या मेहुणीच्या अंत्यसंस्काराला येणे देखील टाळले.

जात नाही ती जात असे म्हणतात. जागतिकीकरणाच्या या व्यापात देखील जात माणसाला आणि माणूस जातीला सोडायला काही तयार नाही. जातीवरून आत्तापर्यंत अनेकांची आयुष्य उद्धवस्त झालेली आहेत. त्यात जात पंचायतीचा जाच आजही आहे तसाच आहे. पण मेल्यानंतर तरी या जातीतून माणसाची सुटका व्हावी अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे? पण, ही हिच जात मरणानंतर देखील तिच्या आडवी आली. जात पंचायतीच्या जाचापायी ओडिशातील एका व्यक्तीला आपल्या मेहुणीचा मृतदेह सायकल वरून नेण्याची वेळ आली आहे. यापूर्वी देखील ओडिशामध्ये अशाच प्रकारची घटना समोर आली होती. ज्यावेळी रूग्णालयाने अॅम्बुलन्स देण्यास नकार दिल्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावरून नेण्याची वेळ ओढावली होती. यावेळी तर समाजाने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या मेहुणीच्या अंत्यसंस्काराला येणे सर्वांनी टाळले आहे. ओडिसातील बौद्ध जिल्ह्यामधील कृष्नापल्ली या गावात हा सारा प्रकार घडला आहे.

 

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

ओडिशातील कृष्नापल्ली गावामध्ये चतुर्भुज बांक राहतो. चतुर्भुज बांकला पहिल्या पत्नीपासून मुल झाले नाही. त्यानंतर त्याने दुसऱ्या जातीतील मुलीशी दुसरे लग्न केले. त्यामुळे गावाने चतुर्भुज बांक याच्या परिवारावर बहिष्कार टाकला. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. दोनच दिवसापूर्वी चतुर्भुज बांकच्या मेहुणीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यावेळी रूग्णालयाच्या अॅम्ब्युलन्सने मृतदेह गावात सोडला. पण अंत्यसंस्काराला यायला गावकऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे मेहुणीचा मृतदेह सायकलवरून नेत तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

वाचा – रूग्णालयाचा ढिसाळ कारभार; त्याने ‘आई’चा मृतदेह नेला बाईकवरून

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -