घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: अधिवेशन जाणीवपूर्णक गुंडाळण्याचा प्रयत्न नाही - बच्चू...

Maharashtra Assembly Winter Session 2021: अधिवेशन जाणीवपूर्णक गुंडाळण्याचा प्रयत्न नाही – बच्चू कडू

Subscribe

कोरोनामुळे अधिवेशनाचे दिवस कमी आहेत. तसेच अधिवेशन जाणीवपूर्णक गुंडाळण्याचा प्रयत्न नाहीये आणि भाजपच्या आरोपांना अर्थ नाही, असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा दिवस नाहीये. कारण कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणजे ओमिक्रॉन येण्याची शक्यता आहे. अधिवेशन अधिक काळं असावं, असं मला वाटतं. कारण तो शासनाचा आत्मा आहे. जितके अधिवेशन अधिक काळ चालेल. तितके प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे सरकारची मजबूती वाढत असते. त्याचप्रकारे अधिवेशन जाणीवपूर्वक गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न नाहीये, असं बच्चू कडू म्हणाले.

- Advertisement -

भाजपकडून जे आरोप होताहेत त्याला काहीही अर्थ नाहीये

सीडब्लूसीबाबत आज महत्त्वाची बैठक पार पडली. परंतु या बैठकीमध्ये ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही असा भाजपने आरोप केला. तसेच अधिवेशनाचे दिवस सुद्दा वाढवून मागितले होते. असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. त्यावेळी बच्चू कडू म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा दिवस नाहीये. कारण कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणजे ओमिक्रॉन येण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहिली असता इतर राज्यांमध्ये सुद्धा एक ते दोन दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं. तसेच लोकसभेचं अधिवेशन कमी काळात पार पाडलं. त्यामुळे भाजपकडून जे आरोप होत आहेत. त्याला काहीही अर्थ नाहीये, असे बच्चू कडू म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांनी दोन पाऊलं मागे जा..

वीज तोडणीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत मुद्दा उपस्थित करत काही निर्देश दिले आहेत. चालू वर्षातील बील भरण्याबाबत ऊर्जा मंत्र्यांना सांगण्यात आले आहे. कारण चालू वर्षातील वीजबिल करता थकित बीलाला कोणीही मागणी करणार नाही. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांबाबत बच्चू कडू म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी दोन पाऊलं मागे जा आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं देखील कडू म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार, नाना पटोलेंची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -