घरदेश-विदेशवैमानिक कोरोना पॉझिटिव्ह; विमान अर्ध्यातूनच बोलवले माघारी

वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह; विमान अर्ध्यातूनच बोलवले माघारी

Subscribe

एअर इंडियाचे विमान उझबेकिस्तानवरुन बोलावले माघारी

कोरोना व्हायरसमुळे मॉस्कोला जाणारे एअर इंडियाचे विमान शनिवारी दिल्लीला परत आहे. दिल्लीहून मॉस्कोला निघालेले एअर इंडियाचे विमान उझबेकिस्तानवरुन माघारी बोलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कारण या विमानातील एक वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. शनिवारी सकाळी या विमानाने रशियाच्या मॉस्को शहरात जाण्यासाठी दिल्ली विमानतळावरुन उड्डण केले होते. दरम्यान, एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) यांनी सांगितले की विमान माघारी आल्यानंतर त्यातील त्रुटी तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतीयांना आणण्यासाठी विमान पाठवले होते

रशियाच्या मॉस्को शहरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे विमान पाठवण्यात आले होते. कोरोना पार्श्वभूमीवर असलेल्या नियमाप्रमाणे विमानाच्या उड्डाणाआधी टीमकडून क्रू मेंबर्सचे रिपोर्ट तपासले जातात. तसेच यावेळी देखील विमानाच्या कॅप्टनचा रिपोर्ट तपासण्यात आला होता. या कॅप्टनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता, मात्र नजरचुकीने पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह समजून कॅप्टनला उड्डाणाची परवानगी देण्यात आली.

- Advertisement -
…आणि विमान माघारी बोलावले

एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडियाचे ए -३२० नियो विमान भारतीयांना परत आणण्यासाठी मॉस्को येथे जात होते. विमान उझबेकिस्तानच्या हवाई क्षेत्रात पोचले होते त्यादरम्यान अधिकाऱ्यांना लक्षात आले की, त्या विमानात प्रवास करत असलेला वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह आहे. ”

सर्व क्रू मेंबर्स होणार क्वारंटाइन 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, “दररोज मोठया प्रमाणावर कोरोना टेस्ट रिपोर्ट तपासावे लागतात. त्यामध्ये नजरचुकीने हे घडले. दिल्लीत दररोज ३०० क्रू मेंबर्सची टेस्टिंग सुरु आहे. एक्सल शीटमध्ये हे सर्व रिझल्ट येतात. त्यामध्ये ही चूक घडली”, असे सांगण्यात येत आहे. तसेच  एअरबस ए ३२० विमानाने दुपारी १२.३० च्या सुमारास दिल्ली विमानतळावर लँडिंग केले. नियमानुसार सर्व क्रू मेंबर्स क्वारंटाइन होणार असून या विमानाचे आता निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. एअर इंडियाकडून शनिवारी दुसरे एअसबस ए ३२० विमान मॉस्कोला पाठवण्यात येईल.

- Advertisement -
एअर इंडियाने सतर्कता दाखवत विमान बोलावले माघारी

विमानाने उ़ड्डाण केल्यानंतर दोन तास झाले होते. सुदैवाने विमानामध्ये प्रवासी नव्हते. क्रू मेंबर्सचे रिपोर्ट पुन्हा क्रॉसचेक करत असताना वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. एअर इंडियाने घडलेल्या प्रकाराबद्दल सतर्कता दाखवत लगेच विमानाला माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विमान उझबेकिस्तानच्या आकाशात होते. वंदे भारत मिशनतंर्गत एअर इंडियाची विमाने वेगवेगळया देशांमध्ये पाठवण्यात येत आहेत. यावेळी सरकारने उड्डाणाआधी विमानातील सर्व क्रू मेंबर्सची कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे.


राज्यात २,३२५ पोलीस कोरोनाग्रस्त, २४ तासांत ११४ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -