घरदेश-विदेश'सर्व मुसलमानांनी भाजपाविरोधात एक व्हायला हवे'

‘सर्व मुसलमानांनी भाजपाविरोधात एक व्हायला हवे’

Subscribe

अकबरुद्दीन ओवैसी यांनी २०१३ साली केलेल्या वादग्रस्त विधानावर ते असे म्हणाले की, 'मी केलेले '१५ मिनिटांचे' ते वक्तव्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. ज्यांचे घाव अजूनही भरलेले नाही. यामुळे या अकबरुद्दीन ओवैसी एवढा द्वेष केला जातो.'

आक्रमकपणे विधान करणारे एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा विधान केलं आहे. अकबरुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे छोटे बंधू आहेत. तेलंगणामधील करीमनगर येथे सभेत बोलताना ते असे म्हणाले की, ‘आमच्या पक्षाच्या पराभवाचा आम्हाला त्रास नाही. पण आम्हाला भाजपाचा विजय हा अमान्य आहे. तसेच सर्व मुसलमानांनी भाजपाविरोधात एक व्हायला हवे.’

२०१३ मध्ये अकबरुद्दीन ओवैसी यांनी ‘आम्ही २५ कोटी आहोत आणि तुम्ही हिंदू १०० कोटी आहात. फक्त १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. मग कोणामध्ये किती दम आहे हे दिसेल’,असे वादग्रस्त विधान केले होतो. यालाच अनुसरून ते म्हणाले की, ‘मी केलेले १५ मिनिटांच्या त्या वक्तव्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. ज्यांचे घाव अजूनही भरलेले नाही. यामुळे या अकबरुद्दीन ओवैसी एवढा द्वेष केला जातो.’

- Advertisement -

या सभेत अकबरुद्दीन यांनी तरुणांना आवाहन केलं की, ‘आम्ही येथे जे काही काम करतो त्या बदल्यात आपल्याला जन्नत मिळते. मात्र जे शहीद होतात ते जन्नतींच्या जन्नतीमध्ये जातात. म्हणून तुमच्यासमोर तरुणांनो जर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी झाल्या तर तुम्ही त्यावेळी अल्लाचे नाव घ्या,’ असे वक्तव्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -