घरट्रेंडिंगआता फक्त ३० मिनिटांत हवं ते मिळणार! Amazon करणार ड्रोनने डिलिव्हरी

आता फक्त ३० मिनिटांत हवं ते मिळणार! Amazon करणार ड्रोनने डिलिव्हरी

Subscribe

अमेरिकेच्या एफएएने अ‍ॅमेझॉनला ड्रोनमार्फत पॅकेज डिलिव्हरीसाठी दिली परवानगी

अ‍ॅमेझॉन ही जगातील सर्वात मोठी आणि नावाजलेली ऑनलाईन ई-कॉमर्स कंपनी असून अ‍ॅमेझॉन लवकरच सामानाची डिलिव्हरी ड्रोनने करणार आहे. यामुळे फक्त आणि फक्त ३० मिनिटांत ड्रोनच्या मदतीने सामान ग्राहकांच्या घरी पोहोचण्यास मदत होणार आहे. अ‍ॅमेझॉनला पार्ट १३५ एअर कॅरिअर सर्टिफिकेट मिळाल्याने कंपनी प्राइम एअर ड्रोन्स वापरू शकते. विशेष म्हणजे अमेरिकेच्या एफएएने अ‍ॅमेझॉनला ड्रोनमार्फत पॅकेज डिलिव्हरीसाठी परवानगी दिल्याचं सांगितले जात आहे.

सामानाची ड्रोनमार्फत डिलिव्हरी नेमकी कधीपासून सुरू केली जाणार याबाबत ग्राहकांना सध्या सांगू शकत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे तर अ‍ॅमेझॉन सध्या ड्रोनचे उड्डाण आणि इतर गोष्टींचे परीक्षण करत असल्याची माहिती मिळत आहे. ड्रोनच्या मदतीने सामानाची डिलिव्हरी करण्याच प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोसने २०१३ मध्ये असे अ‍ॅमेझॉन येत्या काही वर्षांत ड्रोनने डिलिव्हरी करणार असल्याचं म्हटले होते आणि त्याच दिशेने कंपनीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

जगातील कित्येक देशांमध्ये अ‍ॅमेझॉन एका दिवसात डिलिव्हरी करत आहे. मात्र आता हा डिलिव्हरी टाईम आणखी कमी करण्याचा कंपनीचा उद्देश असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. असे सांगितले जात आहे की, कोणत्याही कंपनीने मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात ड्रोनने डिलिव्हरी करणं सुरू केलेले नाही. पार्ट १३५ एअर कॅरियर सर्टिफिकेट मिळणारी ॲमेझॉन तिसरी कंपनी आहे. याआधी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या विंग एव्हिएशन आणि यूपीएस फ्लाइट फॉरवर्डला हे सर्टिफिकेट मिळालं आहे.


तुम्हाला कर्जाचे हफ्ते भरावे लागणार का? आज Supreme Court मध्ये सुनावणी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -