घरताज्या घडामोडीऐन सणासुदीच्या वेळी अमूल दुधाच्या दरात वाढ, सर्वसामान्यांना महागाईचा फटका

ऐन सणासुदीच्या वेळी अमूल दुधाच्या दरात वाढ, सर्वसामान्यांना महागाईचा फटका

Subscribe

अमूल दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे ऐन दिवाळीच्या वेळी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. अमुलने दिल्लीत दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. याआधी सुद्धा ऑगस्टमध्ये दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. दिल्लीत एक लीटर फुल क्रीम दुधाची किंमत ६३ रुपये प्रति लिटर झाली आहे.

महागाईच्या आकडेवारीनुसार, पशुखाद्याचा महागाई दर ९ वर्षांच्या २५ टक्क्यांहून अधिक विक्रमी पातळीच्या जवळपास राहिला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. अमुलने वाढत्या खर्चाचे कारण देत किमती वाढवत असल्याचे म्हटले आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर २५.५४ टक्के राहिला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात २०.५७ टक्के होता. तर ऑगस्ट महिन्यात जनावरांच्या चाऱ्याचा दर २५.५४ टक्क्यांवर पोहोचला होता.

- Advertisement -

राज्यातील गोकुळ तसेच अन्य डेअरींनीही दुधाच्या दरात वाढ केली होती. आता पुन्हा एकदा ऐन सणांच्या काळात दुधाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -